कमी काळात जास्त परताव्याच्या आमिषाला भुलू नका

    19-Apr-2024
Total Views |
 
 
 
cyber
 
एका रात्रीत काेणी श्रीमंत हाेत नाही. बचत आणि गुंतवणुकीचे याेग्य नियाेजन केल्यावरच ते श्नय हाेते आणि त्यासाठी दीर्घ काळ लागताे. पण, सध्याच्या काळात सर्वांना झटपट श्रीमंत व्हायचे असल्याने जास्त परताव्याच्या आमिषाला फसून, लाेक पैसे गमावतात. उत्तर प्रदेशातील जाैनपूर येथील आयआयटी-बी. टेक.च्या तिसऱ्या वर्षातील एका विद्यार्थ्याला हा माेह नडला. अभ्यासक्रम संपविण्यापूर्वी त्याला श्रीमंत व्हायचे हाेते. पुढील सेमिस्टरची फी भरण्यासाठी त्याला शिष्यवृत्ती मिळाली हाेती आणि ती रक्कम बँकेत हाेती. बंगळुरूतील ‘फिस्डाेम’ ब्राेकर फर्मचे ऑनलाइन अ‍ॅप त्याच्या पाहण्यात आले.मात्र, आपण फसवणुकीच्या ‘पिग बुचरिंग’ या प्रकाराला बळी पडल्याचे त्याला नंतर समजले. या अ‍ॅपने ‘फिस्डाेम’चा मुखवटा घातला हाेता आणि त्यात त्याची शिष्यवृत्तीची दाेन लाख रुपयांची रक्कम त्याला गमवावी लागली.
 
मात्र, अशी फसवणूक झालेला ताे एकटा नाही. ओरॅकलमधील एका माजी वरिष्ठ महिलेचेही सहा लाख रुपयांची फसवणूक झाली आहे.गुंतवणुकीच्या नावाखाली ‘पिग बुचरिंग’द्वारे लाेकांची फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. यात गुन्हेगार बनावट अ‍ॅप्स आणि वेबसाइट्सद्वारे लाेकांना जास्तीत जास्त पैसे गुंतविण्याच्या माेहात पाडतात आणि नंतर गायब हाेतात. याची दखल यंत्रणांनी घेतली असून, उपाययाेजना केल्या जात आहेत.पैसे गुंतविण्यापूर्वी सावध राहण्याचे आवाहन स्टाॅक मार्केट ए्नस्चेंजने केले आहे. ‘देशातील किंवा परदेशांतील माेबाइल नंबर्सद्वारे गुन्हेगार साेशल मीडिया ग्रुप्स, टेलिग्राम चॅनेल्स, फेसबुक, इन्स्टाग्राम चॅनेल्स आदी साेशल मीडिया प्लॅटफाॅर्म्सचावापर करत आहेत. माेठ्या वित्त कंपन्यांची बनावट प्रमाणपत्रे त्यासाठी वापरली जात आहेत,’ असे एनएसईच्या सूचनेत नमूद करण्यात आले आहे. ‘फिस्डाेम,’ ‘धन’, ‘फायर्स’ आणि ‘चाॅइस’सारख्या ब्राेकर्सनीही त्यांच्या कंपन्यांच्या नावांच्या गैरवापराबाबत वेगळ्या सूचना देऊन ग्राहकांना सावध केले आहे.
 
‘केकेआरपीआरओ’ या बनावट अ‍ॅपच्या जाळ्यात सापडून एका गृहिणीने 90 लाख रुपयांची रक्कम गमाविल्याचे वृत्त नुकतेच आले हाेते. ‘काेहेलबर्ग क्राविस राॅबर्ट्स अँड काे.’ या अमेरिकन गुंतवणूकदार कंपनीचे हे नाव असल्याच्या समजातून ती फसली.
इन्स्टाग्राम अथवा फेसबुकवरील जाहिरातीतून गुन्हेगार संपर्क सुरू करतात. डायरे्नट मेसेजची (डीएम) पद्धतही वापरली जाते.
व्हाॅट्सअ‍ॅप अथवा टेलिग्राम ग्रुपमध्ये तुम्ही येण्यासाठी हे केले जाते. खऱ्या कंपनीचे नाव वापरून हे केले जाते. ‘मी फिस्डाेम या नावाचा गुगलवर शाेध घेतला तेव्हा चांगले रिव्ह्यूज आणि रेटिंग्ज दिसली. मी काेणाबराेबर बाेलताे आहे याचाही शाेध घेतला. मात्र, खऱ्या व्यक्तीचे प्राेफाइल ल्निंडइनवर असूनही त्याला मेसेज पाठविला नाही ही चूक झाली,’ असे आयआयटीचा हा विद्यार्थी म्हणताे. ताे आणि ओरॅकलमधील महिला यांची कहाणी समान आहे.
 
ते व्हाॅट्सअ‍ॅप ग्रुपवर जाॅइन झाले तेव्हा त्याचा अ‍ॅडमीन अथवा अ‍ॅडिमिनिस्ट्रेटर ट्रेडिंगच्या दिवशी दुपारी दाेन वाजता स्टाॅ्नसची शिफारस करावयाचा. ग्रुपमध्ये 150 सदस्य हाेते आणि त्यांच्या अ‍ॅडमीनची नावे करण बत्रा आणि राकेश सिंह अशी हाेती. ते स्वत:ला फिस्डाेम ब्रेकिंग अ‍ॅपचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आणि चीफ ए्निझ्नयुटिव्ह ऑफिसर म्हणवून घेत हाेते.ग्रुपमधील काही ‘प्राेफेसर्स’ स्टाॅक टिप्स अपलाेड करायचे. काही जण राेजच्या ट्रेडिंगमधून मिळालेला नफाही सांगायचे.फिस्डाेमच्या म्हणण्यानुसार, या कंपनीच्या नावाने 150 व्हाॅट्सअ‍ॅप ग्रुप चालत हाेते. प्रत्येकाने वेगळी शिफारस केल्यावर एक ग्रुप विजेता हाेणे सहज श्नय हाेते. सदस्यांचा विश्वास मिळविल्यावर अ‍ॅडमिनने सदस्यांना त्यांच्या माेबाइलवर एक अ‍ॅप इन्स्टाॅल करण्यास सांगितले. ट्रान्झॅ्नशनंची पद्धत विचित्र हाेती.थेट ब्राेकिंग अकाउंट्समध्ये रक्कम ट्रान्सफर केली जाण्याची पद्धत असताना या अ‍ॅपमधून एका बँकेत ती ट्रान्सफर केली जात हाेती.
 
ती केल्यावर अर्ध्या तासात तुमच्या नावावर अ‍ॅपमध्ये दिसत असे.ही रक्कम थेट ट्रान्सफर का करता येत नाही, असा प्रश्न काहींनी केल्यावर अ‍ॅडमिनने काही तरी उत्तर देऊन समाधान केले. त्यासाठी फिस्डाेम आणि सेबी यांच्यातील बनावट करारही दाखविला.
सदस्यांचा विश्वास बसावा म्हणून अ‍ॅडमिनिस्ट्रेटर काही रक्कम काढूही देत हाेता.गुंतवणूकदारांना एका आठवड्यात 30-40 टक्के परताव्याचे आश्वासन देण्यात आले हाेते. किमान शंभर शेअर्स खरेदीची अटही हाेती. मात्र, खऱ्या करण बत्रा यांची ल्निंडइनवरील पाेस्टपाहिल्यावर हा विद्यार्थी आणि त्या महिलेला वास्तवाची जाणीव झाली. ‘माझ्या नावाने काही जण गैरव्यवहार करत आहेत,’ असे खऱ्या करण बत्रा यांनी या पाेस्टमध्ये म्हटले हाेते. या विद्यार्थ्याने लगेच त्याची गुंतविलेली सर्व रक्कम काढून घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याला परवानगी नाकारण्यात आली. कंत्राटाचे नियम माेडल्याबद्दल आणखी पन्नास हजार रुपये भरण्यास त्याला सांगितले गेले. ओरॅकलमधील महिलेने मात्र सावकाशपणाने छाेट्या प्रमाणात रक्कम काढून घेणे सुरू ठेवल्याने ती पाच लाख रुपये परत मिळवू शकली.