मुलांना दयाभावना शिकवणे महत्त्वाचे

    18-Apr-2024
Total Views |
 
 

kids 
 
आदर-मान-दयाभावना
 
 घरातील वातावरणातून व कुटुंबीयांच्या व्यवहारातून मुले शिकत असतात. आपण एकमेकांशी जसे बाेलाल तेच मुले शिकतील. पालकांनी घरातील वडीलधाऱ्यांशी आदराने वागावे. घरातील लहानांशी समानतेने वागावे.
 
 प्रत्येक निर्णयात माेठ्यांचे मत घ्या व काेठेही जाण्यापूर्वी त्यांची आज्ञा घ्या. चुकीबद्दल माी मागा व चांगले काम केल्याबद्दल धन्यवाद द्या.
 
 दुकानदाराकडून सामान घेतल्यानंतर व गार्डने गेट उघडल्यानंतर त्यांनाही धन्यवाद द्या.यामुळे मुले प्रत्येक लहान-माेठ्या व्य्नतींंशी आदराने वागतील. एखाद्याचा आदर करणे व धन्यवाद देणे त्यांना उत्तम माणूस बनवील. तसेच मुले माेठी झाल्यानंतरही पालकांसाेबतच इतरांशी आदराने वागतील.
 
सर्वांना स्वीकारण्याचा गुण
 
 एखाद्याचा रंग काळा असेल वा एखादा जाड व बुटका असेल तर अशा फरकाची भावना मुलांच्या मनात येऊ देऊ नका. यासाठी पालकांनी मुलांसमाेर सर्वांशी समान वागायला हवे.
 
 जर पालक एखाद्यातील दाेषाची चेष्टा करतील वा एखाद्याच्या व्यंगावरून त्याला चिडवतील तर हीच भावना मुलांमध्ये येईल. त्यामुळे मुलांना काेणाच्याही रंग वा रूपात फरक करणे याेग्य नाही हेच शिकवायला हवे.
 
 याचप्रमाणे मुलाच्या एखाद्या मित्राच्या कुटुंबाची आर्थिक स्थितीही मैत्रीत आडवी येऊ देऊ नका.जेव्हा मूल शाळा-काॅलेजात वेगवेगळ्या लाेकांना भेटेल तेव्हा त्याला त्यांच्यामध्ये मिसळणे साेपे जाईल.त्यांच्याशी ताे समानतेने वागेल व सकारात्मक विचार व व्यक्तिमत्व दर्शवील.
 
जुळवून घेण्यास शिकवा
 
 मुलाला काेणत्याही परिस्थितीशी जुळवून घ्यायला शिकवा. ताे जर बटाटा खात नसेल व घरात बटाट्याची भाजी केली असेल तर त्याच्यासाठी वेगळी भाजी बनवण्याऐवजी तीच भाजी त्याला खायला सांगा.
 
 जर त्याचा हट्ट पुरवाल तर त्याच्या मागण्या वाढत जातील ज्याची त्याला सवय लागेल. जर मुलाला एसी, कार अशा सवलतींची सवय असेल तर त्याला त्याशिवाय राहायला शिकवा.
 
 मुलांच्या गरजा भागवण्यासाठी वारेमाप पैसा खर्च करीत असाल तर ही सवय सुधारा.पैशावर आधारित जीवन नैराश्याचा सामनाही करवू शकते. कारण परिस्थिती एकसमान राहात नसते.भविष्यात ती बदलू शकते. पैसा नव्हे तर माणसे महत्वाची असतात, हे मुलांना शिकवा.