घरून काम करण्याचे ायदे

    17-Apr-2024
Total Views |
 
 

health 
 
दुसरा फायदा म्हणजे घरूनच काम असल्यामुळे घरी जर एखादी अडचण आली तर ती चटकन साेडवता येते.परिवारकडे लक्ष देऊन काम करता येते. बॅचलर लाेकांना नाेकरीच्या ठिकाणी राहायची गरज नाही त्यामुळे त्यांचा खर्च माेठ्या प्रमाणावर वाचला आणि खायप्यायचे हालही हाेत नाहीत. ऑफिसच्या राजकारणापासून दूर राहताे. सगळेच जण घरुन काम करत असल्याने गाॅसिप नावाचा प्रकार कमी हाेताे.
 
ड्रेसकाेड पाळावा लागत नाही: घरून काम करायचे असले की, ऑिफसला जाताना याेग्य अशी औपचारिक वेशभूषा करावी लागते, ती घरून काम करताना करावी लागत नाही. हा सगळ्यात माेठा ायदा असताे. तयार हाेऊन बाहेर पडायला लागण्यामधील त्यात अनेक गाेष्टी येतात. ऑिफसला सूट हाेणारे कपडे, अ‍ॅक्सेसरीजची खरेदी, कपड्यांना इस्त्री, डबा तयार करणे, ताे भरणे, गाडी असेल तर पेट्राेल भरणे, बस-लाेकलचे तिकीट, पास काढणे अशा अनेक गाेष्टी करत राहाव्या लागतात. तुमच्या साेयीचे कपडे तुम्ही घालू शकता. राेज प्रवासात धुळीने आणि घामाने खराब हाेणारे कपडे धुवून इस्त्री करण्याची वेळ येत नाही. प्रवासातील वेळ वाचताे ः सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे राेज ऑिफसला जाण्यासाठी किमान एक तासापर्यंतचा कालावधी आणि परत येण्यासाठी लागणारा तेवढाच वेळ वाचताे. त्याशिवाय ट्रॅिफकमधील वाहनांची काेंडी, त्यामुळे येणारा ताण, बस-लाेकलमधील गर्दी, उभे राहून करावा लागणारा प्रवास त्यामुळे येणारा थकवा या सगळ्या गाेष्टींपासून सुटका हाेते. प्रवासाचे भाडे, पेट्राेलचा खर्च वाचताे.
 
अधिक उत्पादकता आणि कार्यक्षम ता: ताण, थकवा येणाऱ्या गाेष्टींपासून म्हणजेच धकाधकीच्या प्रवासापासून तुमची सुटका झाल्याने घरात अधिक कार्यक्षमतेने काम करण्यामुळे तुमची उत्पादकता वाढते.त्याचबराेबर एकाग्रतेने काम हाेत असल्याने नेहमीपेक्षा कमी वेळेत आणि अधिक गुणवत्तापूर्ण काम हाेते.
 
वेळेची साेय:साेयीनुसार कुठल्याही वेळेला काम करता येते. दिवसातील कुठल्याही वेळी आणि आठवड्यातील कुठल्याही दिवशी कामाला बसता येते.डेडलाइन्स असतील तर घरी पाेचायला उशीर हाेण्याची चिंता करत न बसता घरात रात्री-अपरात्री केव्हाही काम करता येते.त्यामुळे रात्री उशिरा काम संपवून घरी येण्यात जी रिस्क असते तिला ताेंड द्यावे लागत नाही.