बाजार समितीतील कर्मचाऱ्यांचे युनिफॉर्म घोळदार

    17-Apr-2024
Total Views |
 
ba
 
पुणे, 16 एप्रिल, (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
 
पुणे बाजार समितीमधील अधिकारी कर्मचारी यांच्या युनिफॉर्मसाठी तब्बल सुमारे 15 ते 20 लाख रुपये खर्च करूनदेखील ठेकेदाराकडून निम्म्याहून जास्त युनिफॉर्ममध्ये कोणाची पँट, शर्ट ढगळी झाली, तर कोणाच्या पँटचा एक पाय मापापेक्षा बाहेर आला आहे. तसेच कोणाच्या कंबरेचे माप चुकले आहे, अशा अनेक चुकांमुळे अधिकारी- कर्मचारी हैराण झाले असून, काहींनी स्वखर्चातून कपडे अल्टर करून घेतले. मात्र, समितीकडून ठेकेदारावर कोणतीही कारवाई केली नाही. पुणे बाजार समितीवर संचालक मंडळ आल्यानंतर संचालक मंडळाने बाजार समितीच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना युनिफॉर्म शिवण्याचा निर्णय घेतला. तर, महिला कर्मचाऱ्यांना साड्या देण्याचा निर्णय झाला.
 
संचालक मंडळाने बंद पाकिटात निविदा प्रक्रिया राबवली. यामध्ये रुबाब इंडिया या ठेकेदार कंपनीला युनिफॉर्मचे काम देण्यात आले. त्यानुसार ठेकेदाराच्या माणसाकडून अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या कपड्यांची मापे घेण्यात आली. व्यवस्थित मापे घेऊनही शिलाई व्यवस्थित केली गेली नाही. अनेकांच्या कपड्यांच्या मापे लहानमोठी झाली. पँट, शर्ट ढगळे झाले. दरम्यान, बाजारातील सुमारे 330 तोलणार यांना बाजार समितीने प्रत्येकी दोन याप्रमाणे 660 ड्रेस शिवून दिले. बाजार समितीवर संचालक मंडळ येण्यापूर्वी तत्कालीन प्रशासकांनी तोलणारांना वेिशासात घेत युनिफॉर्मसाठी कापड निवडले. त्यानुसार संचालक मंडळाने शिलाईसाठी सुवर्ण स्टाईल द टेलर यांना हे काम दिले. तोलणारांचा युनिफॉर्म व्यवस्थित शिवले गेले. कामाबाबत कोणत्याही तक्रारी आल्या नाहीत. मात्र, कापड बदलले गेल्याची चर्चा आहे.
 
चुकीचे युनिफॉर्म शिवल्याने सध्या संबंधित ठेकेदाराकडून युनिफॉर्म अल्टर करून घेण्याचे काम केले जात आहे. कपड्यांच्या अल्टरनंतरही व्यवस्थित युनिफॉर्म नसल्यास ठेकेदारावर कारवाई केली जाईल.
                                                                                                            -डॉ. राजाराम धोंडकर, सचिव, बाजार समिती पुणे