कलागृह आणि संस्कार भारतीच्या वतीने चित्रकला प्रदर्शन

    17-Apr-2024
Total Views |

art 
 
पुणे, 16 एप्रिल (आ.प्र.) :
 
भारतीय संस्कृतीमधील नववर्ष स्वागताच्या निमित्ताने कलागृह व संस्कार भारती पिंपरी चिंचवड समितीच्या दृश्यकला विभागातर्फे ‌‘चैत्र पालवी' या चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. नववर्ष व रामनवमी या निमित्ताने आयोजित केलेल्या या प्रदर्शनात पिंपरी-चिंचवड परिसरांतील 20 कलाकारांनी आपल्या कलाकृती सादर केल्या आहेत. प्रदर्शनाचे उद्घाटन महासाधू श्री मोरया गोसवी यांचे वंशज व श्री राम मंदिर देवस्थान ट्रस्टचे (चिंचवड) मुख्य वेिशस्त श्रीकांत श्रीपाद देव यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी कलाकारांचे कौतुक करून मार्गदर्शनही केले. या प्रसंगी सर्व चित्रकार व रसिक उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी वातावरण राममय झाले होते.
 
प्रदर्शनामध्ये रती देशमुख (मधुबनी शैली), करण गायकवाड (पावडर शेडिंग), इशीता पांडे (गुढी), योगेश दीक्षित (रामनामाचा जप करणारे मारुतीराया), प्रणिता मरेवार व लीना आढाव (श्रीराम व सुग्रीव भेट), अंबादास पांडे (श्रीरामांचे गुढ्या उभारून स्वागत), मयूरी बिस्वास अल्पना (नवीन वर्ष), सायली रानवडे (श्रीरामांचा राज्याभिषेक), छाया गायकवाड (मारुतीराया आणि श्रीराम भेट), रोहन जाधव, नरेंद्र गंगाखेडकर, श्रीराम व प्रफुल्ल भिष्णूरकर (आनंदाने नृत्य करताना मारुतीराया), वैशाली गायकवाड (चैत्रांगण) अशी चित्रे सादर केली आहेत. ‌‘चैत्र पालवी' हे प्रदर्शन येत्या 21 एप्रिल 2024 पर्यंत पी. एन. गाडगीळ अँड सन्स कलादालन (औंध) येथे विनामूल्य सुरू आहे. सर्वांनी या प्रदर्शनाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन संस्कार भारती (पिंपरी-चिंचवड) समितीच्या सचिव लीना आढाव यांनी केले आहे. प्रत्येक चित्र पाहताना विषय समजून घेत, त्यामागील चित्रकाराची भावना, आणि चित्र निर्मिती मागील विचार हे खूप सुंदर आहेत, अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून व्यक्त होत आहेत.