नेतृत्वगुण विकासासाठी चांगले व्नतृत्व हव

    16-Apr-2024
Total Views |
 
 

thoughts 
 
 
एवढेच नाही, तर त्यातून आपाेआपच शब्दसंग्रह वाढताे, त्यामुळे शब्दांच्या जुगलबंदीत व्यक्ती टिकाव धरू शकते. मग वाचलेलं खरंच आहे की खाेटं, कारण प्रत्येक लेखक लेखन करताना स्वतःचे विचार ओतण्याचे प्रयत्न करताे. त्यामुळे बऱ्याचदा वैचारिक लिहिताना लेखक एक बाजू तेवढी स्पष्ट करताे, ती खाेटी आहे की खरी हे लेखकालाच माहीत असते. अशावेळी समाेरच्या लेखकाचा संदर्भ देत किंवा त्यांनी लिहिलेले विचार भाषणातून मांडताना विराेध हाेण्याची संभावना निर्माण हाेते.यासाठी वाचनानंतर संबंधित साहित्याची व लेखकाच्या विचारांची समीक्षा करणे आवश्यक आहे. त्यातून स्वतः ची विचार करण्याची क्षमता वाढते आणि प्रत्युत्तर देण्याची सुद्धा!
 
वक्तृत्व उत्त्तम असेल, तर नेतृत्व गुणाचा विकास हाेताे. उत्तम वक्तृत्व म्हणजे काय? भाषणातून किंवा मार्गदर्शनातून व्यंग्य निर्माण करणे म्हणजे उत्तम वक्तृत्व, की चढ्या आवजात बाेलणे म्हणजे उत्तम वक्तृत्व? ही फक्त वक्तृत्वाची शैली झाली, हे उत्तम वक्तृत्वाचे पूर्ण गुण नाहीत. व्यंग्य करीत बाेलल्याने लाेक आनंद घेऊन ऐकतात; पण व्यंग्य तार्किक नसेल किंवा बाेलत असलेल्या विषयाला धरून नसेल, तर बऱ्याचदा बाेलणारी व्यक्ती मनाेरंजनास पात्र ठरते. त्यामुळे विषयाची मांडणी ही तार्किक आणि संदर्भबद्ध असणे आवश्यक आहे. बिनतर्क बाेलल्याने बरेच नेते मंडळी विनाेदाचे पात्र ठरले आहेत.विषयाची मांडणी करताना प्रेक्षकवर्गाचा वयाेगट लक्षात घेणे आवश्यक आहे.
 
कारण प्रत्येक वर्गाची बाैद्धिक क्षमता ही वेगवेगळी आहे. त्यामुळे लहान वयाेगटाच्या प्रेक्षकवर्गासमाेर जर का भारदस्त शब्दात भाषण दिलं, तर ते त्यांच्या डाेक्याच्या वरून जाते. या उलट हसत खेळत साध्या शब्दात विषयाची मांडणी केली, तर ते आनंद घेत ऐकतात. म्हणूनच बरेचदा प्राथमिक शिक्षक नृत्याच्या शैलीत विद्यार्थ्यांना शिकवतात. वक्तृत्वाची विभागणी वेगवेगळ्या प्रकारात हाेते. भाषण, मार्गदर्शन, वाद-विवाद, विषय विवेचन, चर्चा ह्या सर्व प्रकाराची मांडणी वेगवेगळी असावी लागते. भाषण आणि मार्गदर्शन हे बरेचदा एकतर्फी असते. परंतु, विवेचन आणि चर्चा संवादात्मक असते.वादविवादाची शैली ही आक्रमक प्रकारची असते, त्यामुळे प्रत्येक वक्तृत्वाचे स्वत:चे एक गुणधर्म आहेत आणि त्या मापदंडात राहून वक्तृत्व कला जाेपासल्यास व्यक्ती उत्तम वक्ता हाेऊ शकते.
 
ज्याच्या अंगी उत्तम वक्तृत्व आहे ती व्यक्ती याेग्य प्रकारे नेतृत्वसुद्धा करू शकते. बरेचदा आपण नेत्यांचा उल्लेख बाेलघेवडे असे करताेच. कारण त्यांच्या वक्तृत्व शैलीतून लाेक आकर्षित हाेतात आणि त्यांचे अनुकरणसुद्धा करायला लागतात. आता नेतृत्व म्हणजे फक्त राजकीय क्षेत्रातील नाही, तर प्रत्येक क्षेत्रात नेतृत्व तयार हाेते.कामगार, कृषी, वैद्यकीय, शिक्षण, समाजकार्य अशा सर्व क्षेत्रांचे नेतृत्व करणारे त्या-त्या क्षेत्रांतील नेते आपण पाहताेच. ते संबंधित क्षेत्राचा चांगल्या प्रकारे अभ्यास करतात आणि त्या विषयातील उत्तम वक्तृत्व कला आत्मसात करतात आणि लाेकप्रिय हाेतात.आध्यात्मिक क्षेत्रात प्रबाेधन करणारे कीर्तनकार उत्तम वक्तृत्वाच्या आधारावर लाेकप्रिय झाल्याची अनेक उदाहरणे आपल्यासमाेर आहेत. त्यामुळे चांगला नेता व्हायचे असेल, तर वक्तृत्व असणे गरजेचे आहे.
-दुर्गेश साठवणे, वर्धा माे.8208068853