देशासाठी दिव्यांग सक्षमीकरण आवश्यक

15 Apr 2024 23:29:08
 
 
 
Governor
 
दिव्यांगांना देशाच्या सामाजिक, आर्थिक प्रगतीत याेगदान देण्यासाठी सक्षम करणे आवश्यक आहे. दिव्यांगांना शिकवण्यात येणारी अनेक काैशल्ये कालबाह्य हाेण्याची शक्यता असून, त्यांना तंत्रज्ञानाच्या मदतीने कृत्रिम प्रज्ञा काैशल्यांच्या बाबतीत अवगत करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.दृष्टिबाधित व्यक्तींना स्पर्शाने समजण्याजाेग्या ‘इन्कलुसिव्ह अ‍ॅटलास इंडिया 2024’ या नकाशांच्या पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते राजभवनात प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते बाेलत हाेते.
 
नॅशनल असाेसिएशन फाॅर द ब्लाइंड (नॅब) या संस्थेने ब्रेल, तसेच सामान्य लिपीतून हा अ‍ॅटलास तयार केला आहे.राज्यपालांनी नॅबला दिलेल्या निधीतून खरेदी केलेल्या ‘ब्रेलाे’ मशीनमुळे दृष्टिबाधित मुलांसाठी ब्रेल लिपीतील पुस्तकाची छपाई, तसेच, निवडणुकीसंबंधित व्हाेटर स्लिप छापण्यास मदत हाेत असल्याची माहिती ‘नॅब’चे मानद सचिव डाॅ. विमल कुमार डेंगला यांनी दिली. स्पर्शजन्य ग्राफीफ अ‍ॅटलास प्रकाशन साेहळ्याला नॅबचे मानद सचिव हरेंद्र कुमार मलिक, कार्यकारी संचालिका पल्लवी कदम, रमाकांत साटम, सुनील कपूर, गुंजना मालवीय आदी उपस्थित हाेत
Powered By Sangraha 9.0