शरीरात इतरत्र पसरल्यावरच कर्कराेग झाल्याचे कळते

    15-Apr-2024
Total Views |
 
 


Cancer
 
 
शरीराच्या इतर अवयवांत पसरल्यावरच कर्कराेग झाल्याचे कळते. भारतीय वैद्यकीय संशाेधन परिषदेच्या (आयसीएमआर) एका कार्यक्रमातून ही माहिती समाेर आली असून, राष्ट्रीय कर्कराेग नाेंदणीच्या आकडेवारीतून हे तथ्य समजले.देशभरातील 7,757 रुग्णालये, नर्सिंग हाेम, ्निलनिक आणि प्रयाेगशाळांत नाेंदणी झालेल्या कर्करुग्णांची माहिती घेऊन ‘आयसीएमआर’ने हा अहवाल तयार केला आहे. त्यात कर्कराेगाची नवीन प्रकरणे, त्यांचा पॅटर्न, निदान-उपचार आणि परिणामांची माहिती देण्यात आली आहे. देशाच्या उत्तर आणि ईशान्य भागांत कर्करुग्णांची संख्या सर्वांत जास्त असल्याचेही त्यात नमूद करण्यात आले आहे.
 
कर्कराेगाचा समावेश गंभीर विकारात हाेताे. वेळेवर त्याचे निदान हाेऊन उपचार सुरू झाले, तर रुग्ण जगण्याची श्नयता जास्त असते. मात्र, इतर अवयवांत पसरल्यावरच ताे समजत असणे ही समस्या असल्याचे दिसले आहे. कर्कराेगाबाबत जागरूकतेच अभाव हे त्याचे कारण असून, गंभीर विकारांबाबत जनजागृती वाढविणे हा त्यावरील उपाय असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. कर्कराेग पसरल्यावर रुग्ण जगण्याची श्नयता कमी हाेते. सध्या या विकारावर उपचार उपलब्ध असले, तरी ताे पसरल्यावर जगण्याचे प्रमाण गेल्या 20 वर्षांत वाढलेले नाही. भारतासारख्या प्रचंड लाेकसंख्येच्या देशात कर्करुग्णही जास्त असल्याने देशावर तेही एक ओझे असल्याचे हा अहवाल म्हणताे.