आफ्रिकेत कबरीतील हाडांचा नशेसाठी वापर

    15-Apr-2024
Total Views |
 
 
 


Africa
 
 
जगभरात ड्रग्जच्या आहारी तरुणाई माेठ्या प्रमाणात वाहवत चालली आहे.यामुळे दरवर्षी माेठ्या प्रमाणात मुलांचा मृत्यूदेखील हाेत आहे. दरम्यान, पश्चिम आफ्रिकेतील सिएरा लिओन या देशातील तरुणाई एका भयंकर ड्रग्जच्या आहारी गेली आहे. झाेंबी ड्रग्ज असे या ड्रग्जचे नाव असून, याची नशा करण्यासाठी येथील तरुण देशातील कबरी खाेदून मानवी हाडांपासून हे ड्रग्ज तयार करून त्याचे सेवन करत असल्याने खळबळ उडाली आहे. सध्या या देशातील परिस्थिती हाताबाहेर गेली असून, येथील सरकारने थेट आणीबाणी लागू केली आहे. पश्चिम आफ्रिकेतील सिएरा लिओन हा अत्यंत गरीब देश आहे. येथे बेराेजगारी माेठ्या प्रमाणात असून, गुन्हेगारीने देखील कळस गाठला आहे. काम नसल्याने माेठ्या प्रमाणात तरुणाई नशेच्या आहारी गेली आहे. येथील तरुण मानवी हाडांपासून तयार करण्यात येणाऱ्या झाेंबी ड्रग या सायकाेक्टिव्ह ड्रग्जच्या आहारी गेले आहेत. यामुळे चिंता वाढली आहे.
 
अतिशय स्वस्त असलेल्या या ड्रग्जमुळे येथे मृत्यूचे प्रमाणदेखील वाढले आहे. पश्चिम आफ्रिकेतील सिएरा लिओन हा एक छाेटा देश आहे. या ठिकाणी माेठ्या प्रमाणात गरिबी आणि बेराेजगारी आहे.येथील सरकार राेजगारनिर्मिती करण्यासाठी अपयशी ठरले आहे. काम नसल्यामुळे येथील तरुणाई नशेच्या आहारी गेली आहे.यासाठी थेट कबरी खाेदून हाडांची चाेरी करून त्याचा वापर झाेंबी नावाचे ड्रग्ज तयार करण्यासाठी केला जात आहे. या ड्रग्जला माेठी मागणी देशात आहे.ड्रग्ज तस्करही हाडे मिळवून स्वस्तात मिळणाऱ्या या ड्रग्जची निर्मिती करून त्याची विक्री करत आहेत. त्यामुळे देशाचे अध्यक्ष ज्युलियस माडा बायाे यांनी कबरींच्या संरक्षणासाठी स्पेशल टास्क फाेर्स तयार केला आहे. तसेच नशेच्या आहारी गेलेल्यांविराेधात नाे टाॅलरन्स पाॅलिसी तयार करण्यात आली असून, या अंतर्गत देशात आणीबाणी लागू करण्यात आली आहे.