ताम्रजल पिण्याचे नियम माहीत असावेत

    14-Apr-2024
Total Views |
 
 

health 
आयुर्वेदानुसार रात्रभर तांब्याच्या जग वा लाेट्यात ठेवलेले पाणी सकाळी प्याले तर आपल्याला अनेक आराेग्यवर्धक लाभ हाेतात. हे ताम्रजल वा काॅपर चार्ज्ड वाॅटर म्हटले जाते. तांबे पाण्यात असलेले कित्येक प्रकारचे खराब बॅ्नटेरिया नष्ट करून पाण्याचे शुद्धिकरण करते. तांब्याच्या भांड्याने पाणी कसे प्यावे, हे जाणून घेऊया.
 
1. तांब्याच्या ज्या भांड्यात पाणी ठेवले आहे त्याच्या स्वच्छतेकडे लक्ष द्यावे.
2. दिवसभरात जास्तीत जास्त दाेन ग्लासच तांब्याचे पाणी प्यावे.
3. ज्यांना खूप जास्त अ‍ॅसिडिटी वा अल्सर असेल त्यांनी हे पाणी पिऊ नये.
4. उन्हाळ्यात दिवसभर तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिऊ नये. कारण यामुळे पाण्याची प्रकृती बदलून जाते.
5. तांब्यात ठेवलेले पाणी पिण्यापूर्वी प्रेग्नंट महिला, हार्ट पेशंट व ज्यांना किडनीची समस्या असेल त्यांनी आपल्या डाॅ्नटरांचा सल्ला घ्यावा.
 
यामुळे हाेणारे फायदे
 
1. त्वचा चमकदार हाेते : शरीराचे टाॅ्निसन बाहेर काढण्यास मदत करते.
स्किनमध्ये चमक येते
 
.2. वजन नियंत्रित ठेवते : तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी बाॅडी डिटाॅ्नस करते. ज्यामुळे शरीरात साचलेले ए्नस्ट्रा फॅट कमी करण्यास मदत मिळते.
 
3. पचन व्यवस्थित राहते : तांब्याचे पाणी प्याल्यामुळे डायजेस्टिव्ह रसाचे उत्पादन वाढते. पचनशक्ती मजबूत हाेते. ज्यांना बद्धकाेष्ठतेचा त्रास असेल त्यांच्यासाठी प्रभावी आहे.
 
4. हृदयासाठी फायदेशीर : हे पाणी प्याल्यामुळे रक्ताभिसरण उत्तम हाेते.याशिवाय यामुळे काेलेस्ट्राॅल कंट्राेलमध्ये राहताे आणि हृदयाशी संबंधित आजारात हे पाणी लाभदायक मानले गेले आहे.