तळेगाव दाभाडेचे दुय्यम निबंधक कार्यालय मुद्रांकातून मालामाल

    13-Apr-2024
Total Views |

tale 
 
तळेगाव दाभाडे, 12 एप्रिल (आ.प्र.) :
 
तळेगाव स्टेशन येथे गतवर्षी अद्ययावत नूतन वास्तूत स्थलांतरित झालेल्या दुय्यम निबंधक कार्यालय मावळ 2 मध्ये मुद्रांक शुल्क व दस्त नोंदणीच्या माध्यमातून आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 281 कोटी 7 लाख 47 हजार 877 रुपये सरकारी तिजोरीत जमा झाले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत ही रक्कम 134 कोटी 78 लाख 9 हजार 758 रुपयांनी जास्त आहे. आर्थिक वर्षात 15 हजार 783 दस्त नोंदणी झाली आहे, अशी माहिती दुय्यम निबंधक विजयकुमार झिंगाडे यांनी दिली. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी 1016 दस्तांची अधिक नोंदणी झाली आहे. या माध्यमातून राज्य सरकारच्या महसुलामध्ये 265 कोटी 69 लाख 90 हजार 516 रुपयांचा मुद्रांक, तर 15 कोटी 37 लाख 57 हजार 361 रुपयांची नोंदणी फी जमा झाली आहे. जून महिन्यात सर्वाधिक 1 हजार 653 दस्तांची नोंदणी झाली आहे. तर, जुलै महिन्यात सर्वात कमी 1 हजार 69 दस्तांची नोंदणी झाली आहे. डिसेंबर महिन्यात सर्वाधिक 106 कोटी 4 लाख 79 हजार 305 रुपयांचा महसूल राज्य शासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे.