झाेप अर्धवट झाल्यास आपले आराेग्य बिघडते

    11-Apr-2024
Total Views |
 
 

sleep 
 
 प्राैढ व्यक्तींमध्ये सामान्य झाेपेचा कालावधी 7-9 तास असताे.
 
 कमी झाेपल्यामुळे मेंदूला आराम मिळू शकत नाही व यामुळे तणाव वाढताे ज्याचा परिणाम कार्यक्षमतेवर हाेताे. ज्यामुळे राग, चिडचिड व डिप्रेशन अशा समस्या सुरू हाेतात.
 
 स्मरणशक्ती कमकुवत हाेऊ लागते. राेजच्या सामान्य गाेष्टीही विसरू लागतात. यामुळे निर्णय घेण्याची क्षमताही कमजाेर हाेते.
 मेटाबाॅलिज्म रेट (जेवणातून मिळणाऱ्या ऊर्जा वापराचा दर) वर परिणाम हाेताे. यामुळे शरीरात चरबी वाढू लागते ज्याचा हृदयाच्या आराेग्यावर दुष्परिणाम हाेताे आणि हृदयासंबंधित समस्यांचा धाेका वाढताे.
 
 राेगांशी लढण्याची क्षमता कमी हाेऊ लागते.राेगप्रतिकार क्षमता कमकुवत झाल्यामुळे व्यक्ती राेगांच्या तावडीत सापडताे.
 
 पाेट व पचनावरही नकारात्मक परिणाम हाेताे व यामुळे तणाव वाढताे. हार्माेन असंतुलित हाेतात ज्यामुळे आजकाल महिलांमध्ये थायराॅइड, पीसीओडीसारखे अनेक हार्माेनल त्रास वाढत आहे. तसेच महिलांना चिडचिड, मूड स्विंग, पीरियडची अनियमितता व स्थूलतेसारख्या समस्यांचा सामना करावा लागताे.
 
 फक्त एक दिवसाची कमी झाेपही इन्शुलिन रेझिस्टेंस वाढवते. अर्थात रक्तात साखरेचे प्रमाण वाढते.
दीर्घकाळपर्यंतच्या कमी झाेपेमुळे डायबिटीसचा धाेका वाढत जाताे.
 
उत्तम झाेप कशी येईल
 
 वेळेवर झाेपण्या व जागण्याचा याेग्य स्लीपिंग पॅटर्न बनवा.
 झाेपताना चहा, काॅफी, काेल्ड ड्रिंक असे पेयपदार्थ टाळावेत.
 मद्यपान व धूम्रपान टाळावे.
 झाेपताना इले्नट्राॅनिक उपकरणांचा वापर मर्यादित करावा. कारण प्रकाश, टीव्ही वा संगीतासाेबत झाेपल्यास श्रवण व दृश्य संकेतांच्या माध्यमातून झाेपेची गुणवत्ता प्रभावित हाेते. प्रकाशाच्या संपर्कात आल्यास झाेपेसाठी आवश्यक मेलाटाेनिन हार्माेनचा स्राव कमी हाेताे.
 झाेपण्यापूर्वी चालण्याचा व्यायाम करावा.