कमी मतदान असलेल्या केंद्रांबाबत सूक्ष्म नियाेजन करण्यात यावे

    31-Mar-2024
Total Views |
 
 

voting 
 
कमी मतदान असलेल्या मतदान केंद्रांबाबत सूक्ष्म नियाेजन करून स्थलांतरित कामगारांचे मतदान सुलभ हाेईल, यासाठी कृतियाेजना तयार करावी, अशा सूचना बारामती लाेकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय अतिर्नित आयु्नत कविता द्विवेदी यांनी दिल्या.विभागीय आयु्नत कार्यालयात आयाेजित आढावा बैठकीत त्या बाेलत हाेत्या. अपर जिल्हाधिकारी हनुमंत अरगुंडे, उपायु्नत समीक्षा चंद्राकार, बारामती लाेकसभा मतदारसंघातील सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि लाेकसभा निवडणुकीसाठी नियु्नतजिल्हास्तरीय समन्वयक अधिकारी या वेळी उपस्थितहाेते. द्विवेदी म्हणाल्या, ‘स्वीप कार्यक्रमावर अधिक भर दिल्यास मतदानाची ट्नकेवारी वाढविण्यासाठी मदत हाेईल; तसेच स्थलांतरित कामगारांना मतदानाविषयी माहिती द्यावी, यासाठी उद्याेजक आणि व्यावसायिकांची मदत घ्यावी.
 
ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांना सुलभपणे मतदान करता येईल अशी व्यवस्था करावी. मतदान कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेताना निवडणूक आयाेगाच्या सूचनांचे पालन करण्यात करावे. बारामती लाेकसभा मतदारसंघांतर्गत सर्व 6 विधानसभा मतदारसंघांतील वैशिष्ट्यपूर्ण मतदान केंद्रे निश्चित करून त्याची माहिती सादर करावी. अशा मतदान केंद्रांवर मतदारांसाठी सर्व आवश्यक सुविधा असतील तसेच अत्यंत सुलभपणे मतदान हाेईल अशी व्यवस्था करावी.’ यावेळी मतदान कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, ईव्हीएम व्यवस्थापन, स्वीप कार्यक्रम, माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण, टपाली मतदान, सुरक्षाव्यवस्था आदी विविध विषयांचा आढावा घेण्यात आला.जिल्हास्तरीय समन्वयक अधिकाऱ्यांनी विविध विषयांबाबत मार्गदर्शन केले.