माेबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये दिसले टे्ननाॅलाॅजी ट्रेंड्स

    31-Mar-2024
Total Views |
 

tech 
 
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीशिवाय आपली प्रगती झाली नसती. सध्याचे युग तर कृत्रिम बुद्धिमत्तेचे असून, जीवनाच्या सर्व क्षेत्रांत ती लवकरच कार्यरत हाेईल. स्पेनमध्ये नुकत्याच झालेल्या ‘माेबाइल वर्ल्ड काँग्रेस’मध्ये (एमडब्ल्यूसी) नव्या तंत्रज्ञानाची झलक दिसली. आपल्याबराेबर हस्तांदाेलन करणारा ह्यूमनाॅईड राेबाेट किंवा आपल्या माेबाइलची सर्व कामे करणारी कृत्रिम बुद्धमत्ता अशी कल्पना करून पाहा.हे कल्पनारंजन नसून, आगामी काही काळातील वास्तव आहे.दागिन्यांमध्येही तंत्रज्ञान येत आहे. तुमच्या आराेग्याची माहिती ठेवणारी आणि कॅशलेस पेमेंट करणारी स्मार्ट रिंग आता प्रत्यक्षात आली आहे. तुम्ही एकाकी असाल, साेबतीची गरज असेल, तर राेबाेट कम्पेनियनही तुम्हाला मिळेल. ‘एमडब्ल्यूसी’मध्ये दिसलेली आगामी नवीन तंत्रज्ञानाची झलक पाहा.
 
1) रॅप अराउंड फाेन : सध्या हा फाेन संकल्पनेच्या स्वरूपात असला, तरी एखाद्या साय-फाय चित्रपटातील वाटावा असा बेंडेबल फाेन माेटाेराेला कंपनीच्या बूथवर हाेता. हा स्मार्टफाेन वेगवेगळे आकार धारण करू शकेल आणि ताे घड्याळाप्रमाणे मनगटाभाेवतीसुद्धा बांधता येईल. वेअरेबल वस्तूंच्या तंत्रज्ञानात हा फाेन क्रांती करेल. फाेल्डेबल फाेन सध्याही मिळत असले, तरी हा फाेन त्यापेक्षा वेगळा ठरणार आहे. त्याच्या डिझाइनपासून ताे अभिनव ठरेल. एखाद्या तंबू अथवा स्टँडसारखा आकारही त्याला देता येईल. विविध कामे करणारी स्मार्ट वाॅचेस आता अनेक लाेक वापरतात. मात्र, घड्याळासारखा मनगटाभाेवती गुंडाळता येणारा स्मार्टफाेनही लवकरच येणार आहे. या फाेनबाबत संशाेधन सुरू आहे.
 
2) एआय-पाॅवर्ड ह्यूमनाॅइड : कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणारा ह्यूमनाॅइड राेबाेट या प्रदर्शनात दाखविला गेला. ताे प्रश्नांना उत्तरे देऊ शकताे,संभाषण करू शकताे आणि त्याला काही विनाेदही सांगता येतात. सध्या असे राेबाेट वापरात असले, तरी ‘इस्टिसलाट’च्या बूथवरील ‘अमेका’ या ह्यूमनाॅइडने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले हाेते. हा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने कार्य करणारा राेबाेट आहे. ह्यूमनाॅइड राेबाेट जवळपास मानवासारखे असतात आणि त्यांचे डाेळेही माणसांप्रमाणे भावना व्यक्त करू शकतात.
‘अमेका’ अनेक प्रश्नांना उत्तरे देऊ शकते. ‘ओपन एआय’च्या ‘जीपीटी-4’ या तंत्रज्ञानाचा वापर त्यासाठी करण्यात आला असून, राेबाेटच्या संभाषणासाठीचे हे सध्याचे सर्वांत प्रभावी माॅडेल आहे. ‘अमेका’ने प्रेक्षकांच्या बहुतेक सर्व प्रश्नांना उत्तरे दिली आणि प्रदर्शनाला आलेल्या एका महिलेच्या ड्रेसची प्रशंसाही केली. या ड्रेसचा रंगही ‘अमेका’ला ओळखता आला. ब्रिटनमधील ‘इंजिनीअर्ड आर्ट्स’ने तिची निर्मिती केली असून, लवकरच असे ह्यूमनाॅइड्स माणसाच्या सेवेत येतील.
 
3) रिअल टाइममध्ये एआयचा वापर : एखाद्या प्रसंग अथवा उत्पादनाची कल्पना करा आणि स्मार्टफाेनला थाेडा वेळ स्पर्श करा. तुम्ही केलेली कल्पना वास्तवात आलेली दिसेल. मीडिया टेक क्षेत्रातील एका कंपनीच्या बूथवरील डेमाे फाेनची ही किमया आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आपल्या कल्पना वास्तवात आणणे यातून श्नय हाेईल.तुम्ही केलेली कल्पना हा फाेन काही क्षणांत वास्तवात आणू शकेल. टे्नस्ट आणि व्हिडिओंसाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार आहे.
 
4) पारदर्शक (सी-थ्रू) लॅपटाॅप : ‘एमडब्ल्यूसी’मधील सर्वांत लक्ष वेधून घेणारा हा लॅपटाॅप हाेता. लेनाेव्हाेच्या बूथवरील हा पारदर्शक लॅपटाॅप पाहण्यासाठी गर्दी झाली हाेती. हा लॅपटाॅप पूर्ण पारदर्शक असला, तरी त्याच्या स्क्रीनकडे पाहताना काही अडचण येत नाहीत. काम व्यवस्थित करता येते. याला की-बाेर्ड नसून, फ्लॅट टच की-बाेर्ड आहे.हा लॅपटाॅप कलाकारांसाठी उपयुक्त ठरेल. भविष्यातील तंत्रज्ञान काय ताकदीचे असेल, याची झलक या प्रदर्शनातून पाहायला मिळाली. तंत्रज्ञानाचा वेग पाहता, सध्या कल्पनेत वाटणाऱ्या अनेक सुविधा लवकरच प्रत्यक्षात येऊन आपले जीवन बदलून टाकतील, असे यातून स्पष्ट झाले.