‘झीराे-फूड चिल्ड्रेन’चे प्रमाण उत्तर प्रदेशात सर्वाधिक

    31-Mar-2024
Total Views |
 
 


food
 
 
 
गुंतवणुकीसाठी शहरी महिलांचे प्राधान्य लिस्टेड इक्विटिजना माेकाट शहामृगाने उडविली वाहनचालकांची तारांबळ ‘जामा नेटवर्क ओपन’मधील अभ्यासातील माहिती; अशा मुलांच्या संख्येत भारताचा क्रमांक जगात तिसरापाेटात गेल्या 24 तासांत अन्न न गेलेल्या मुलांचे प्रमाण असलेला भारत हा जगातील तिसरा देश आहे. ‘झीराे-फूड चिल्ड्रेन’ असा या मुलांचा उल्लेख केला जाताे आणि उत्तर प्रदेशात अशा मुलांचे प्रमाण 28.4 टक्के असल्याचे एका अभ्यासातून दिसले आहे.लखनाै शहराच्या विशाल खंड या भागातील 26 वर्षांच्या घरेलू कामगार सुनीता गाैतम यांना त्यांच्या 11 महिन्यांच्या मुलाला पुरेसे अन्न देण्याची चिंता आहे. त्या म्हणाल्या, ‘सध्या माझा मुलगा पूर्णपणे माझ्यावर अवलंबून आहे. मी त्याला स्तनपानाबराेबर खीरही देत असले, तरी ती राेज देता येत नाही. त्याला स्तनपानाची सवय असल्याने ताे खीर खाण्यास वेळ लावताे.
 
मी पैसे मिळविले नाहीत, तर मला त्याची काळजी घेता येणार नाही.’ 24 तासांत पाेटात अन्न न गेलेल्या 6 ते 23 महिने वयाेगटांतील अशा मुलांचा उल्लेख ‘झीराे-फूड चिल्ड्रेन’ असा केला जाताे. अशी बालके किंवा अर्भकांच्या पाेटात घन, द्रव, दूध किंवा अर्ध घन (सेमी साॅलिड) अशा काेणत्याही स्वरूपातील काेणतेही पाैष्टिक अन्न गेलेलनसते. ‘जामा नेटवर्क ओपन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासातील माहितीनुसार, भारतातील ‘झीराे-फूड चिल्ड्रेन’चे प्रमाण 19.3 टक्के असून, ते चिंताजनक आहे.ही अन्नाची कमतरता आहे आणि अशा मुलांच्या प्रमाणात भारत जगात तिसरा आहे. पहिल्या क्रमांकावर गिनी (21.8 टक्के) तर दुसऱ्या क्रमांकावर माली (20.5 टक्के) हे देश आहेत. संख्येचा विचार केला, तर सहा काेटींपेक्षा जास्त मुलांसह भारत हा सर्वाधिक ‘झीराे-फूड चिल्ड्रेन’ असलेलादेश असल्याचे या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.
 
‘ई्निलनिकल मेडिसीन’ने 2023मध्ये केलेल्या एका अभ्यासाची माहिती ‘लॅन्सेट डिस्कव्हरी सायन्स’ने प्रसिद्ध केली आहे. ‘भारतातील एकूण झीराे-फूड चिल्ड्रेनमध्ये उत्तर प्रदेश (28.4 टक्के), बिहार (14.2 टक्के), महाराष्ट्र (7.1 टक्के), राजस्थान (6.5 टक्के) आणि मध्य प्रदेश (6 टक्के) या राज्यांचा सुमारे दाेन तृतीयांश वाटा आहे,’ असे हा अहवाल म्हणताे. बालके सहा महिन्यांपेक्षा जास्त वयाची झाल्यावर केवळ स्तनपानातून त्यांना सर्व पाैष्टिक घटक मिळत नाहीत. बालकांच्या निकाेप वाढीसाठी स्तनापानाबराेबरच घन अथवा अर्धघन आहाराचीसुद्धा गरज असल्याचे अन्न आणि कृषि संस्थेने स्पष्ट केले आहे. 9 ते 11 महिन्यांच्या बालकांना पाैष्टिक आणि उष्मांकांसहच्या अन्नाची गरज निम्मी, म्हणजे 50 टक्के असते.
 
सहा ते आठ महिन्यांच्या बालकांना मात्र स्तनपान पुरेसे ठरत असल्याचे संस्थेने म्हटले असले, तरी अनेक माता त्यांच्या मुलांना पुरेसा पाैष्टिक आहार देऊ शकत नसल्याची स्थिती आहे.उमा चाैहान या चार घरांमध्ये स्वयंपाक करून देतात. त्यांना आठ महिन्यांची मुलगी आहे. त्या तिला घन आणि अर्धघन आहार देत असल्या, तरी ताे दरराेज देता येत नाही.सार्वजनिक आराेग्यसेवेतील कर्मचारी शालिनी सिंह यांच्या म्हणण्यानुसार, गरिबीबराेबरच वाढत्या नागरीकरणामुळे उत्तर प्रदेशासारख्या सर्वाधिक लाेकसंख्येच्या राज्यात ‘झीराे- फूड चिल्ड्रेन’ची संख्या वाढते आहे.