चारच दिवसांत भोसरी क्रीडासंकुलातील सिंथेटिक ट्रॅक उखडला

खेळाडूंना दुखापत होण्याची शक्यता असल्याने खेळाडूंमध्ये प्रचंड नाराजी

    28-Mar-2024
Total Views |
 
tr
 
भोसरी, 27 मार्च (आ.प्र.) :
 
भोसरी-इंद्रायणीनगर येथील संत ज्ञानेेशर महाराज क्रीडासंकुलात टाकण्यात आलेला सिंथेटिक ट्रॅक चारच दिवसांत उखडला आहे. यामुळे खेळाडूंना दुखापत होण्याची शक्यता असून, खेळाडूंमध्ये प्रचंड नाराजी आहे. याशिवाय मनासारखा सराव करता येत नसल्याचेही खेळाडूंचे म्हणणे आहे. हा ट्रॅक वर्षभरसुद्धा टिकणार नाही, असा दावा प्रशिक्षक करत आहेत. सध्या हा ट्रॅक चार ते पाच ठिकाणी उकडलेल्या स्थितीत दिसून येत आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील ॲथलेटिक्स खेळाचा सराव करणाया खेळाडूंना सरावासाठी शहरातील एकमेव सिंथेटिक मैदान इंद्रायणी नगर येथे आहे. या ठिकाणी 400 मीटरचा आठ लेनचा सिंथेटिक ट्रॅक आहे.
 
अनेक वर्षांपासून ट्रॅकवर खेळाडूंचा नियमित सराव आणि विविध स्पर्धांमुळे तसेच बाहेरील वातावरणामुळे जुना ट्रॅक खराब झाला होता. वर्षभरापूर्वी जुना सिंथेटिक ट्रॅक बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी सुमारे चार कोटींचा खर्च करण्यात आला आहे. 15 मार्च 2024 रोजी हा ट्रॅक खुला करण्यात आला. मात्र चार ते पाच दिवसातच हा ट्रॅक उखडल्याचे दिसून येत आहे. या क्रीडा संकुलनातील सिंथेटिक ट्रॅकवर दररोज 300 ते 400 अथलेटिक सराव करण्यासाठी येतात. गेले कित्येक दिवस हा ट्रॅक बंद अवस्थेत होता. वर्षभरानंतर या ट्रॅकला मुहूर्त मिळाला. मात्र याचे स्टँडर्ड पालिकेने राखले नसल्या चा प्रशिक्षकांनी केला आहे ज्या कंत्राटदाराने हा ट्रॅक तयार केला. त्या कंत्राटदाराला खेळाबद्दलची माहिती नसल्याचे प्रशिक्षक म्हणतात. त्यामुळे कॉलिटीकडे अत्यंत गंभीर दुर्लक्ष झालेले आहेत. खेळाडूंच्या गरजा काय आहेत हे लक्षात न घेता येते काम करण्यात आलेले आहे. येथे येणाऱ्या खेळाडूंना क्रीडा साहित्य देखील वेळेवर मिळत नसल्याची इथली परिस्थिती आहे.
 
 
tr
 
क्रीडा विभागाचा आंधळा कारभार सुरू आहे खेळाबद्दल कोणतीही माहिती नसलेले निर्णय घेतात. त्यामुळे खेळाडूंचे नुकसान होत आहे. महाराष्ट्र ॲथलेटिक्स टेक्निकल कमिटी कडून नुकतीच या ट्रॅकची पाहणी केली गेली. महाराष्ट्रातील सर्वात निकृष्ट दर्जाचा हा ट्रॅक आहे अशी कमिटीची प्रतिक्रिया होती.यामुळे खेळाडूंमध्ये प्रचंड नाराजी आहे. याबद्दलच्या समस्या दूर करून खेळाडूंना चांगले प्रशिक्षण मिळेल याकडे पालिकेने लक्ष द्यावे.
                                                                                                                              -संदीप गायखे, ॲथलेटिक्स प्रशिक्षक
 
 
 

tr 
 
सिंथेटिक ट्रॅक खेळाडूंना सरावासाठी उपलब्ध झाला. कोट्यावधी रुपये खर्च करून ट्रॅक बदलण्यात आला आहे. पण अवघ्या काही दिवसांतच तो ट्रॅक ठिकठिकाणी उखडला गेला आहे. सराव करत असताना स्पाईक शूजचा वापर केला जातो. यातून तो अजून खराब होईल. संबंधित अधिकाऱ्याने याकडे लक्ष द्यावे
                                                                                                                                             - दिनेश देवकाते (खेळाडू )