पाण्याचा आवश्यक तेवढाच, विवेकी वापर करा

27 Mar 2024 00:49:25
 
 

water 
 
नवी मुंबई हे स्वत:च्या मालकीच्या माेरबे धरणामुळे जलसमृद्ध शहर असले, तरी प्रत्येक व्य्नतीने स्वत:ला किती पाण्याची गरज आहे हे ओळखून पाण्याचा आवश्यक तेवढाच वापर करण्याचे आवाहन नवी मुंबई महापालिकेने जागतिक जलदिनाच्या निमित्ताने केले आहे.जागतिक जलदिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महापालिका मुख्यालयातील विशेष समिती सभागृहात महापालिका आयु्नत डाॅ. कैलास शिंदे यांच्यासमवेत सामूहिक जलशपथ घेण्यात आली.या प्रसंगी माजी आयु्नत राजेश नार्वेकर, माजी अतिर्नित आयु्नत सुजाता ढाेले व विजयकुमार म्हसाळ, प्रशासन विभागाचे उपायु्नत शरद पवार, शहर अभियंता संजय देसाई, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, मुख्य लेखा परीक्षक जितेंद्र इंगळे यांच्यासह अधिकारी उपस्थित हाेते.
 
संयु्नत राष्ट्रसंघाने यंदा ‘शांततेसाठी पाण्याचा वापर’ हे जलदिनाचे घाेषवाक्य जाहीर केले आहे. आपण या वसुंधरेला वाचवू शकताे आणि आपले भविष्य सुरक्षित करू शकताे. यासाठी देशाचा जलरक्षक म्हणून कायम कार्यरत राहण्याची मी शपथ घेत आहे, अशा आशयाच्या जलशपथेत पाणीबचत व पाण्याचा विवेकी वापर करण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली; तसेच पाण्याचा थेंबअन् थेंब साठवून ‘कॅच द रेन’ या अभियानाच्या यशस्वितेसाठी मी संपूर्ण सहयाेग देईन व पाण्याला एक अनमाेल संपदा मानून पाण्याचा वापर करेन, अशीही शपथ घेण्यात आली.
Powered By Sangraha 9.0