एकाच वेळी जन्मलेली 9 बालके तीन वर्षांची झाली

    27-Mar-2024
Total Views |
 
 

Baby 
पाच बाळं एकत्र जन्माला येणं आणि जगणं अजूनही शक्य आहे; पण एकाच वेळी नऊ बाळं जन्माला आली आहेत आणि ती सगळीच्या सगळी जगली आहेत. या घटनेला कारणीभूत माली या देशातील एक जाेडपे आहे. हलिमा सिसे नावाच्या महिलेने 2021मध्ये एकत्रितपणे 9 मुलांना जन्म दिला, इतकेच नाही तर तिची प्रसूतीदेखील सुरक्षित झाली आणि आता ही मुले तीन वर्षांची झाली आहेत. गिनीज वर्ल्ड रेकाॅर्ड्सनुसार, हे एकमेव प्रकरण आहे जिथे एका गर्भधारणेतून 9 मुले जन्माला आली आणि जगली. हलिमा यांनी त्या वेळी पाच मुलगे आणि चार मुलींना जन्म दिला आणि आता ही नऊ मुले निराेगी आहेत. त्यांच्या तिसऱ्या वाढदिवसानिमित्ताने ही 9 मुले पहिल्यांदाच युराेपियन टीव्ही शाेसाठी इटलीला गेली आहेत.