कठाेर मेहनत आणि जिद्दीने जीवन बदलले...

    26-Mar-2024
Total Views |
 
 

thoughts 
 
प्रेझारखंडमधील एका लहानशा शहरातील मुलगा, ज्याचे स्वप्न हाेते इंजिनीअर हाेणे. त्यासाठी आयआयटी मध्ये शिकण्याचे स्वप्न घेऊन दहावीनंतर काेचिंगसाठी काेटाला गेला. पण तिथे त्याला शरीराची चेष्टा हाेण्यास सामाेरे जावे लागले.सावळी त्वचा असल्याने सर्वजण त्याची चेष्टा करत असत. त्याचा इतका सखाेल परिणाम झाला, की ताे तणावाखाली राहू लागला. त्याचे ्नलासमध्ये जाणेही बंद झाले. पण काेणाला माहिती हाेते की, ताेच मुलगा एक दिवस खूप माेठा माॅडेल हाेईल. ही गाेष्ट आहे भारतीय माॅडेल नमन नारनाेलिया म्हणतात की, ‘जेव्हा सहकारी माझ्या रंग-रूपाची चेष्टा करत हाेते, तेव्हा मला चांगले वाटत नव्हते. जेव्हा आईला वाटले मी डिप्रेशनमध्ये जात आहे, तेव्हा तिने सांगितले, ‘घरी ये.’ आणि मी परत घरी गेलाे.’ ...पण हार मानली नाही नमन पुढे म्हणाले, ‘माझ्या आत्मसन्मानावर माेठा आघात झाला.
 
त्यातून बाहेर पडण्यासाठी मी आपल्या अभ्यासातून ब्रेक घेतला. तथापि माझे आई-वडील या निर्णयामुळे आनंदी नव्हते.त्यांना वाटत हाेते की, मी आपले शिक्षण सुरू ठेवावे. पण त्यांच्या म्हणण्यानुसार मी एका रिटेल स्टाेअरमध्ये काम करणे सुरू केले. तिथे कपडे, ग्लॅमर आणि अ‍ॅ्नशनने मला जास्त आकर्षित केले आणि इथूनच सुरू झाली एका नवीन प्रवासाची सुरवातघरातील लाेकांना वाटत नव्हते की, त्यांच्या मुलाने माॅडेलिंग करावे. पण नमनने माॅडेल्सचे यूट्यूब व्हिडिओ पाहणे सुरू केले.ते त्यांची न्नकल करू लागले. कारण त्यांचे मन माॅडेलिंगमध्ये रमत हाेते. त्यानंतर ते आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर आपला पाेर्टफाेलिओ शेअर करू लागले. अशा प्रकारे त्यांनी माॅडेल हाेण्याचे आपले स्वप्न साकार केले.
 
पहिली ऑफर पॅरिसची सुरुवातीला नकार ऐकल्यानंतरही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी 2000पेक्षा जास्त ईमेल वेगवेगळ्या एजन्सीज्नापाठविले आणि स्वत: कार्यरत राहिले.नमन म्हणतात की, सन 2021मध्ये त्यांना इंस्टाग्रामच्या माध्यमातून एका एजंसीचा मेसेज आला. त्यांच्या शब्दांत, ‘या माध्यमातून जेव्हा मला आपल्या पहिल्या शाेच्या विषयी माहिती मिळाली, तेव्हा माझा विश्वासच बसला नाही. मला पॅरिसला जायचे हाेते, आणि हर्मीससाठी रँपवर चालायचे हाेते. मी जेव्हा आपल्या पहिल्या वाॅकसाठी रँपवर उतरलाे, तेव्हा माझे डाेळे स्पाॅटलाॅइटवर हाेते. मला माहिती हाेते की, मी इथे आहे आणि माझ्या मनात जी शंका हाेती, ती गायब झाली.’