नाेकरीसाठी तुम्हाला कशी कंपनी हवी?

    25-Mar-2024
Total Views |
 
 
 

job
job 
अनेक नवीन उमेदवारांचा हा गाेंधळ उडताे की, नाेकरीसाठी लहान ब्रँड निवडावा की माेठ्या नावाशी निगडित हाेण्यासाठी वाट पाहावी?
 
या विषयावर ही अधिक माहिती...सर्वांत आधी हे समजून घ्या की, एक माेठी कंपनी आणि एक लहान कंपनी यांच्यामध्ये निवड करण्याचा सर्वात चांगला मार्ग आपल्या व्य्नितगत आवश्यकता आणि लक्ष्यांवर विचार करणे आहे. त्यात जाे काही परिणाम येईल, ताे चूक किंवा बराेबर यांच्या पट्टीऐवजी तुम्ही त्याला अनुकूलतेच्या पट्टीवर माेजा.तुमच्यासाठी सर्वात चांगला पर्याय काेणा दुसऱ्यासाठी सर्वात चांगला पर्याय हाेऊ शकत नाही. अशा प्रकारच्या गाेंधळातून बाहेर पडण्यासाठी पुढील काही मुद्द्यांशी संबंधित माहिती तुमची मदत करील.
 
पगार आणि लाभ : माेठ्या कंपन्या सर्वसाधारणपणे तुलनेत जास्त पगार आणि चांगले पॅकेज सादर करतात. तर लहान कंपन्यांमध्ये पगार आणि लाभ यांच्यावर संभाषण करण्याबाबत जास्त लवचिकता पाहायला मिळू शकते. ते कामकाजाबाबत तुमच्याअटींविषयीही इच्छुक हाेऊ शकते.ते इ्निवटीसारखे इतर भत्तेसुद्धा देऊ शकतात.करिअर विकासाच्या संधी माेठ्या कंपन्यांजवळ जास्त कामगारांची श्नती आणि प्रत्येक पदासाठी एक रूपरेषा तयार असते. इथे प्रगती करण्याच्या जास्त संधी असतात.
जर तुमचा नकाशा तयार असेल तर याची निवड करणे फायदेशीर ठरेल.
 
तसेच सुरुवातीच्या कारणामुळे स्टार्टअप किंवा लहान कंपन्यांमध्ये विविधतापूर्ण कार्यानुभव मिळविण्याच्या जास्त संधी मिळतात. त्या तुमची वैशिष्ट्ये ठरू शकतात.वर्क लाइफ बॅलन्स लहान कंपन्यांमध्ये नेहमी कमी व्यस्त दिनचर्या असते. वर्क लाइफ बॅलन्ससाठी हे आवश्यक आहे. माेठ्या कंपन्या जास्त स्थैर्यासाठी ओळखल्या जातात. त्यांच्या भविष्याविषयी अनुमान जास्त अचूक लावले जाऊ शकतात.अशा स्थितीत जर तुम्ही जास्त पारंपरिक पद्धतीने करिअर बनवू इच्छित असाल, तर हा जास्त चांगला पर्याय असेल.तथापि, विशेषज्ञांच्या नुसार करिअरच्या सुरुवातीला काेणत्याही कंपनीशी चार वर्षांपेक्षा जास्त निगडित राहणे करिअर ग्राेथसाठी याेग्य नाही.
 
कंपनीचे वातावरण कंपनी माेठी असाे किंवा लहान, कंपनीचे वातावरण महत्त्वाची भूमिका पार पाडते. तुम्ही काेणत्या वातावरणात काम करू इच्छिता, वेगाने आणि स्पर्धात्मक वातावरणात किंवा सर्जनशीलतेबराेबर टीम स्पिरिट आणि आरामात काम करणे पसंत करता? जी काेणती निवड कराल, तिथले वातावरण तुमचे व्य्नितमत्त्व आणि तुमची कार्यशैली यांच्या अनुरूप व्हायला हवे.मिशन आणि मूल्य कंपनीचे मिशन आणि आदर्श काय आहेत? तुम्ही त्यांच्याशी सहमत आहात का? हेसुद्धा पाहा. ज्या कंपनीवर तुम्ही विश्वास ठेवता, तिच्यासाठी काम करणे लाभदायक ठरू शकते.