आराेग्य चांगले ठेवण्यासाठी स्नान करताना खबरदारी घ्यावी

25 Mar 2024 00:13:14
 
 

health 
दैनंदिन कामासाठी सकाळी घराबाहेर पडण्यापूर्वी स्वच्छ स्नान ही अनिवार्य बाब असते. स्नानामुळे त्वचा साफ हाेण्याबराेबरच प्रसन्नही वाटते. काही जण गरम तर काही जण गार पाण्याने स्नान करतात. स्नानामुळे ताजेतवाने वाटण्याचा अनुभव सर्वांनाच येताे. मात्र, स्नान ही घाईने करण्याची बाब नसल्याचे लक्षात ठेवा. बाथरूममधील उत्पादने दर्जेदार असणे ही आराेग्याची पहिली पायरी असते. आपले केस आणि त्वचेचे आराेग्य चांगले ठेवण्यासाठी स्नान करताना काय खबरदारी घ्यावी ते पाहा.
 
फेस मास्क वापरा : नैसर्गिक घटक वापरून तुम्ही घरीच फेस मास्क बनवू शकता. त्यासाठी दाेन टी-स्पून मुलतानी मातीमध्ये थाेडी हळद आणि अर्धा टी-स्पून चंदन पावडर घालून त्याची पेस्ट तयार करा. चेहऱ्यावर हा लेप लावा आणि ताे सुकेपर्यंत थांबा.लगेच
 
माॅइश्चराइज करा : स्नान झाल्यावर लगेच लाेशन लावणे चांगले.  त्यामुळे पाणी बाहेर जाण्यास प्रतिबंध हाेऊन त्वचा आर्द्र राहते. स्नान संपल्यावर लगेच माॅइश्चरायजर लावणे याेग्य ठरते.
 
पाण्याचे याेग्य तापमान : स्नानासाठी खूप गरम पाणी कधीच घेऊ नये. काेमट पाण्याच्या वापरामुळे त्वचेचे आराेग्य चांगले राहते आणि ती काेरडी पडत नाही. अतिशय गरम पाण्यामुळे त्वचेचे नुकसान हाेते, हे विसरू नका.
 
शॅम्पू व्यवस्थित लावा : डाे्नयावर फक्त शॅम्पू ओतू नका, ताे सर्वत्र पसरेल याची काळजी घ्या. डाे्नयावर शॅम्पू टाका आणि ताे सगळीकडे पसरण्यासाठी 30-60 सेकंद चाेळावा. नंतरच स्नान करावे.
 
शरीराची पूर्ण स्वच्छता : स्नान करताना आपल्या त्वचेला याेग्य असलेला साबण वापरावा. मात्र, स्नान झाल्यावर हा साबण पूर्ण सुकेलअशा जागी ठेवा.ओल्या साबणावर जीवाणू वाढतात.गरजेनुसार नवा साबण वापरावा.
 
केस व्यवस्थित सुकवा : स्नानानंतर केस ओले झालेले असतात.ते व्यवस्थित सुकवा आणि मग भांग पाडा किंवा केशरचना करा. केसांच्या आराेग्यासाठी चांगली उत्पादने वापरावीत.
 
हात स्वच्छ ठेवा : दिवसभरात आपल्या हातांनी अनेक जागांना आपण स्पर्श केलेला असताे. त्यामुळे घरी आल्यावर साबणाने चाेळून चाेळून हात स्वच्छ धुतले पाहिजेत. स्नान करतानाही हे तत्त्व पाळायला हवे. हातांवरील जंतुंचा नाश करण्यासाठी साबण वापरा.
 
काेमट किंवा थंड पाण्याने चेहरा धुवा : काेमट पाण्याने चेहरा धुण्यामुळे रंध्रे माेकळी हाेऊन पुरळ येण्याची श्नयता कमी हाेते. नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. त्या मुळे त्वचेची रंध्रे बंद हाेतात. काेमट पाण्यामुळे रंध्रे माेकळी हाेऊन जीवाणूंचा संसर्ग हाेण्याची श्नयता असल्याने थंड पाण्याने चेहरा धुवायला हवा. पुरुषांनी दाढी झाल्यावर माॅइश्चरायजर वापरावे.
Powered By Sangraha 9.0