परीक्षेचा ताण घेऊ नका मदत घ्या

    24-Mar-2024
Total Views |
 
 

Exams 
 
शिक्षक किंवा मित्र-मैत्रिणींची मदत घेण्यात काहीच चूक नाही. शिक्षकांना विनंती करून तुम्हाला न समजलेले महत्त्वाचे टाॅपिक समजावून घ्या. काही विषय मित्रांकडून समजावून घ्या. कुणीच मदतीला येणे शक्य नसेल, तर पैसे देऊन एखादा ट्यूटर शाेधा. तुमच्या मार्कांमध्ये सुधारणा हाेणार असेल, तर चार पैसे खर्च करण्यात काहीच गैर नाही.पदवी मिळवण्याच्या तुमच्या ध्येयापर्यंत पाेचण्यासाठी शिक्षकांना ी देणे म्हणजे आवश्यक आहे, ही बाब लक्षात ठेवा.कारण तुम्ही अडचणीत असताना त्यांची मदत घेत आहात. त्यातून तुम्हाला परीक्षेसाठी काही महत्त्वाचे मुद्दे मिळणार आहेत, याची जाणीव ठेवाअर्धवट साेडून देऊ नका सेमिस्टरमध्ये अभ्यासाला कितीही उशीर झाला असला, तरी परीक्षेची लढाई कधीही अर्धवट साेडण्याचा विचारही करू नका.
 
तुमच्यातील क्षमता आणि हाती असलेल्या वेळेचे याेग्य नियाेजन केले, तर तुम्ही अपेक्षपेक्षा चांगले यश मिळवू शकणार आहात ही बाब कदाचित तुम्हाला ठाऊक नसते.पण, कसाेटीच्या क्षणी आपण आपले सर्वस्व पणाला लावताे आणि स्वतःची खरी क्षमता त्यावेळी कळत असते.परीक्षा चुकवू नका लक्षात ठेवा, एक सेमिस्टर तुमचे भविष्य ठरवणारी असू शकते. एक सेमिस्टर मागे पडल्याने आयुष्यात अनेक उलथापालथी हाेऊ शकतात.त्यामुळे लढाईतून पळ काढण्याचा पळपुटा मार्ग कधीही स्वीकारू नका.एखाद्या सेमिस्टरसाठी ड्राॅप घेतला किंवा अनुत्तीर्ण झालात, तर ती नाेंद तुमच्या एकूण करिअरमध्ये त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे अपेक्षेपेक्षा थाेडे कमी गुण मिळाले तरी चालेल; पण परीक्षा चुकवू नका.
 
शिक्षकांशी प्रामाणिकपणे वागा काेणत्याही कारणाने अभ्यास मागे पडला, तर मित्र-मैत्रिणी आणि शिक्षकच मदतीला येतात हे लक्षात ठेवून सर्वांशी चांगला संपर्क ठेवा. तुम च्यासमाेर असलेल्या अडचणींची माहिती शिक्षकांना वेळाेवेळी देत जा. त्यामुळे तुमचा प्रामाणिकपणा व अडचणींवर माकरण्यासाठी तुम्ही घेत असलेली मेहनत शिक्षकांनी कळेल. त्यातून ते तुम्हाला निश्चितपणे मदत करतील.जास्त काळजी करू नका कमी गुण पडण्याच्या भीतीने जास्त काळजी केली, तर ताण वाढेल. त्यातून मग डाेकेदुखी, निराशा वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्य तेवढा अभ्यास करा. अभ्यासच्या मधे खाण्यासाठी किंवा थाेडा ब्रेक घेण्यासाठी काही वेळ जरूर घालवा. पण, किती वेळ आपण घालवताे आहे यावर तुम्हीच मर्यादा ठेवा. दाेन-अडीच तास अभ्यास केल्यावर 15-20 मिनिटांचा ब्रेक घेण्यास हरकत नाही. फक्त ब्रेकची वेळ 20 मिनिटांच्यापेक्षा जास्त हाेऊ नये.