वेळ प्रबंधनात संकल्प व धैर्य हव

    23-Mar-2024
Total Views |
 
 
 

health 
जन्मासाेबत काळ सुरू हाेताे आणि जेव्हा मृत्यू हाेताे तेव्हा काळ पूर्ण झाला असे म्हणतात. हेच आपले जीवन आहे, पण याचा सदुपयाेगही व्हायला हवा.तसे सर्वांकडेच चाेवीस तास असतात. देवाने पंचविसावा तास काेणालाही दिलेला नाही. त्यामुळे या चाेवीस तासांतून दैनंदिन कामे आणि झाेप हटवल्यानंतर जाे वेळ उरताे त्यात आपल्या ज्या कामांची व्यवस्था आहे ती मिसळा आणि आपल्या कामाचा जाे वेळ आपल्याकडे आहे त्यात भाग पाडून ठेवा. उदा. विद्यार्थ्याने आपल्या अध्ययनाला काळाशी जाेडले, तर परिणाम चांगले मिळतील. मनाेरंजन, पूजाअर्चा या सर्वांची वेळ ठरलेली असते.
 
एवढे सारे जर आपण केले, तरी आणखी एक अडथळा येणार असताे. जाे आहे आपले मित्र व नातलग. कित्येकदा हे आपल्या वेळेच्या व्यवस्थापनात बाधा आणतात. पण, त्यांच्याशीही संबंध ठेवायचे आहेत, वेळही साधायची आहे.यासाठी वेळेच्या व्यवस्थापनात धैर्य आवश्यक आहे. जेव्हा आपण त्याची व्यवस्था करीत असाल, तेव्हा दृढसंकल्प शक्ती ठेवा आणि जेव्हा इतर आपल्या वेळ व्यवस्थापनात हस्तक्षेप करीत असतील तेव्हा धैर्य बाळगा. नंतर वेळेचे व्यवस्थापन हे ओझे न हाेता सुखद परिणामात रूपांतरित हाेईल.