ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांचा विकास करणार

    02-Mar-2024
Total Views |
 
 

CM 
 
भागातील तीर्थक्षेत्रांचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाशमहाराज बाेधले, महंत शिवाजी महाराज, लक्ष्मण मेंगडे, परमेश्वर बाेधले, लक्ष्मण तकीक, विरुपाक्ष शिवाचार्य महास्वामी, राधाबाई सानप यांच्यासह राज्यातील अनेक संतमहंत, कीर्तनकार आदींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचा विधिमंडळात सत्कार केला व आभार मानलग्रामविकास विभागाअंतर्गत येणाऱ्या ‘ब’ वर्गातील तीर्थक्षेत्रांचा पायाभूत विकास हाेण्यासाठी शाश्वत वाढीव निधी उपलब्ध हाेण्याच्या दृष्टीने पुण्यश्लाेक अहिल्यादेवी हाेळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास याेजनेला हिवाळी अधिवेशनादरम्यान मंजुरी देण्यात आली.
 
या याेजनेच्या माध्यमातून तीर्थक्षेत्रांना सुमारे 2000 काेटींचा अतिर्नित निधी उपलब्ध करून दिला जात आहे; तसेच पर्यटन विभागामार्फत प्रादेशिक पर्यटन विकास याेजनेंतर्गत सुमारे 1000 काेटींचा निधी देण्यात आला. याबाबत उपस्थित वारकऱ्यांनी समाधान व्य्नत केले. तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी मंदिरापर्यंत रस्ते, पाणीपुरवठ्याची व्यवस्था, स्वच्छतागृह, शाैचालय, वाहनतळ, भ्नतनिवास, रस्त्यांवरील दिवे आणि संरक्षण भिंत, वृक्षलागवड आदी सुविधा या निधीतून केल्या जातील. राज्यात ‘ब’ वर्ग दर्जा असलेली एकूण 480 तीर्थक्षेत्रे आहेत. त्यांना या वाढीव निधीचा लाभ हाेणार आहे.