राज्यातील सर्व शिक्षकांना आता ड्रेसकाेड अनिवार्य

    19-Mar-2024
Total Views |
 
 


teachers
 
 
 
शिक्षक हे भावी पिढी घडवत असतात; तसेच त्यांच्याकडे गुरू म्हणून पाहिले जाते. त्यामुळे त्यांच्या व्य्नितमत्त्वाचा परिणाम विद्यार्थ्यांवर हाेत असताे. ही बाब विचारात घेता राज्यातील सर्व संबंधित व्यवस्थापनांच्या शाळांतर्गत कार्यरत शिक्षकांसाठी दैनंदिन पेहराव कशा पद्धतीचा असावा, याबाबत शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.महिला शिक्षकांनी साडी अथवा सलवार-चुडीदार, कुर्ता तसेच पुरुष शिक्षकांनी शर्ट-ट्राऊझर पँट परिधान करावी. जीन्स टी-शर्ट चालणार नाही किंबहुना चित्रविचित्र नक्षीकाम असलेले शर्ट नकाे, असे शालेय शिक्षण विभागाने बजावले आहे. विद्यार्थ्यांना जसा गणवेश अनिवार्य असताे त्याचप्रमाणे आता राज्यातील सर्व शिक्षकांनाही ड्रेसकाेड असणार आहे, अशी घाेषणा शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली.
 
सर्व शिक्षकांना आता त्यांच्या नावापुढे टीआर म्हणजे शिक्षक अशी पदवी लावता येणार आहे. तसा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. शिक्षकांचे समायाेजन करताना नव्या नियमांची लवकरच घाेषणा करण्यात येणार आहे.राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी, अल्पसंख्याक आदी सर्व व्यवस्थापनांतर्गत अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित; तसेच अल्पसंख्याकव्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या व सर्व बाेर्डांच्या शाळांतील कार्यरत शिक्षक भावी पिढी घडवत असतात. या शिक्षकांचा संबंध विद्यार्थी, पालक, गावातील प्रतिष्ठित व्य्नती व लाेकप्रतिनिधींशी येत असताे.
 
अशावेळी त्यांची वेशभूषा हा त्यांच्या व्य्नितमत्त्वाचा महत्त्वाचा भाग म्हणूनपाहिला जाताे. संबंधितांच्या वेशभूषेवरूनच ते कार्यरत असलेल्या पदाची विशिष्ट छाप पडते. त्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांना अध्यापनाचे काम करताना वेशभूषेबद्दल जागरूक राहून आपली वेशभूषा शाळेस व पदास किमान अनुरूप ठरेल, अशी असावी.विद्यार्थी अनुकरणप्रिय असतात. त्यामुळे शिक्षक पदाची वेशभूषा ही अशाेभनीय, अव्यवस्थित किंवा अस्वच्छ असेल, तर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम त्यांच्या एकंदरीत व्य्नितमत्त्वावर; तसेच विद्यार्थ्यांवर हाेत असताे. ही बाब विचारात घेता राज्यातील सर्व संबंधित व्यवस्थापनांच्या शाळांतर्गत कार्यरत शिक्षकांसाठी दैनंदिन पेहराव कशा पद्धतीचा असावा, याबाबत शिक्षण विभागाने सूचना जारी केल्या आहेत.