स्वाभिमानाने जगण्यास जाेपासा स्व-सन्मान

    19-Mar-2024
Total Views |
 
 
 
 
self respect
 
दैनंदिन व्यवहारांत प्रसंगानुसार तडजाेडी कराव्या लागतात हे खरे असले, तरी स्वसन्मान (सेल्फ-एस्टिम) जपणेही आवश्यक असते. काही वेळा नैराश्य अथवा अन्य काही कारणांमुळे ताे कमी हाेताे आणि त्याचा परिणाम हाेताे स्वाभिमानावर. हा स्व-सन्मान जपणे ही आपलीच जबाबदारी असल्याने लक्ष दिले पाहिजे.जागरूक राहिलात तर ते श्नय हाेते. यात काही अडथळे येत असतील, तर त्यावर मात करायला हवी. यांना ‘रेड फ्लॅग्ज’ म्हणतात. म्हणजे, तुमच्या मार्गातील समस्या.
 
स्व-सन्मानातील सात ‘रेड फ्लॅग्ज’ :
 
-तुम्ही स्वत:वर सतत टीका करत राहणे, स्वत:ला दाेष देत राहणे. तुम्हीच तुमचे कडवट टीकाकार हाेता. त्यामुळे तुमचे प्रत्येक पाऊल चुकीच्या दिशेने पडून अपयश येण्याचा धाेका वाढताे.
-स्वत:च्या निर्णयांवर विश्वास ठेवण्याऐवजी तुम्ही सतत इतरांनी केलेल्या मूल्यमापनावर अवलंबून राहायला लागणे.
-तुम्हाला अपयशाची भीती वाटते. वास्तवात पाहता, ती सर्वांनाच वाटत असते. पण, जास्त भीतीमुळे तुमचे नातेसंबंध, करिअरव्यवसाय यांच्यावर विपरीत परिणाम हाेताे.
-इतरांबराेबर सतत स्वत:ची तुलना करत राहण्यामुळे तुम्ही त्या सापळ्यात अडकता.
-स्वत:च्या गरजा बाजूला ठेवून तुम्ही कायम इतरांच्या गरजांना प्राधान्य देता. तसे करणे प्रशंसनीय असले, तरी कायम असे वागण्यामुळे तुमचा स्व-सन्मान घटत जाताे.
-‘नाही’ म्हणणे तुम्हाला जमत नाही आणि सतत इतरांसाठी धावत राहता. ‘हाे’ आणि ‘नाही’ची सीमारेषा तुम्हाला कळत नाही.
-तुमची काही चूक नसतानाही तुम्ही वारंवार माफी मागत राहता.
 
ही लक्षणे तुमच्यामध्ये दिसत असली, तरी घाबरण्याचे कारण नाही. ही लक्षणे ओळखणे हाच त्यातून बाहेर येण्याचा पहिला उपाय आहे. मात्र, ही प्रक्रिया संथ असल्याने वेळ लागेल. स्व-सन्मान राखण्यासाठी पाच पायऱ्या काेणत्या ते पाहा.
 
सीमारेषा निश्चित करा : जीवन अथवा व्यवहारांत सीमारेषा निश्चित करणे फार महत्त्वाचे असते. तुम्हीच त्या नक्की केल्या नाहीत तर दुसरे त्या करतात. प्रत्येक नात्यात सीमारेषा हव्यात. तशा त्या निश्चित करणे म्हणजे तुम्ही स्वार्थी अथवा निष्ठूर ठरता असेही नाही. तुम्ही स्वत:चा आणि इतरांचाही सन्मान करता असा त्याचा अर्थ असताे.सीमारेषा निश्चित केल्यामुळे तुम्हाला श्नय नसते तेव्हा नकार देऊन वेळ आणि ऊर्जा वाचविता येते. तुमचा गैरफायदा घेणे टळते.आपल्याला जमत नसेल, तेव्हा ठामपणाने नाही म्हणायला शिका आणि आपल्या मर्यादा स्पष्टपणाने सांगा. प्रारंभी तुम्हाला ते अश्नय वाटत असले, तरी चिकाटीने प्रयत्न केला, तर जमेल.
 
नकारात्मक विचार बदला : नकारात्मक विचार हा स्व-सन्मानातील मुख्य अडथळा असल्याने त्यापाून दूर राहायला हवे. त्यासाठी कायम सकारात्मक विचार करावा. सुविचार आणि प्रेरणादायी विधाने दरराेज लिहायला लागा. आपली काैशल्ये, बुद्धी आणि क्षमता जाणून घेतल्यात, तर आपल्याला काय करता येईल याची जाणीव तुम्हाला हाेते. जीवनात कसाेटीचे प्रसंग येत असले, तरी शांत डाे्नयाने विचार करून त्यावर मात करता येते. स्वसन्मान त्यातून जपला जाताे.
 
तुलना बंद करा : प्रत्येक व्यक्ती वेगळी असल्यामुळे इतरांबराेबर आपली तुलना बंद करा.तुलना केल्यामुळे फक्त मन:स्ताप हाेताे. तुलना करण्याचा एक ताेटा म्हणजे, आपण कायम स्वत:ला कमकुवत आणि इतरांना यशस्वी समजणे. साेशल मीडियातील माहिती प्रत्येक वेळी खरी नसते. तिच्यावर अवलंबून राहू नका. त्या जगाचा वास्तवाशी संबंध नसल्याचे लक्षात ठेवा आणि खंत करणे बंद करा. तुमच्या आयुष्याचा प्रवास तुम्हीच करावयाचा आहे ताे स्वाभिमानाने, हे विसरू नका.
 
स्वत:ची बलस्थाने ओळखा : प्रत्येक व्यक्तीची बलस्थाने वेगळी असतात. आपली अशी स्थाने ओळखणे हे स्व-सन्मान जपण्याचा एक मार्ग असताे.आपल्या बलस्थानांबराेबरच काैशल्यांचा विचारही त्यासाठी करा. आपले प्राधान्यक्रम, मूल्यांची जपणूक आपणच करावी लागते. बलस्थाने ओळखून त्यांना काैशल्याची जाेड दिल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढून यश मिळायला लागते.स्व-सन्मान ही फार माेलाची बाब असून, जीवनाच्या प्रवासात ती तुम्हाला साथ देते. लाेकांना सदैव खूश ठेवणे आणि इतरांबराेबर तुलना करण्यासारख्या बाबींतून ती कमी हाेऊन तुम्हालाच त्याचा त्रास हाेताे. हे टाळणे शिकायला हवे. मर्यादा ठरवा, नकार देण्यास शिका आणि आपले प्राधान्यक्रम ठरवा. त्यातून तुम्ही स्व-सन्मान जपू शकाल आणि सर्वांबराेबरचे तुमचे संबंधही चांगले राहतील