नर्सने सांगितले डेथ रॅटलचे रहस्य

    19-Mar-2024
Total Views |
 
 


Nurse
 
 
 
मृत्यूपूर्वी मिळणाऱ्या या संकेतांनंतर मरणाच्या दारात असताना व्यक्ती कशाप्रकारे आवाज करतात याबद्दलचा धक्कादायक खुलासा रुग्णालयात काम करणाऱ्या एका नर्सने केला आहे. मृत्यूपूर्वी व्यक्ती जाे आवाज काढते त्याला डेथ रॅटल असं म्हणतात. याच डेथ रॅटलबद्दल ज्युली मॅकफॅडेन नावाच्या नर्सने काही धक्कादायक अनुभव शेअर केले आहेत.मृत्युशय्येवर असलेल्या रुग्णांची देखभाल करण्याचे काम 41 वर्षीय ज्युली करते.याच आपल्या प्राेफेशनदरम्यान आलेले अनुभव तिने कथन केले आहेत.मृत्यूच्या दारात असलेल्या व्यक्तीला मृत्यूला घाबरू नका असा सल्ला ज्युली तिच्या कामाचा भाग म्हणून देते. मात्र, लाेक मरणाच्या दारात असताना नेमकं काय करतात, कसे आवाज काढतात याबद्दलचे आपले अनुभव साेशल मीडियावर शेअर करून ज्युलीने हजाराे फाॅलाेअर्स मिळवले आहेत.
 
टिक-टाॅकवर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये ज्युलीने लाेक मरण पावण्याआधी कसे आवाज काढतात हे सांगितलं आहे. रुग्णांनी असे आवाज काढणे ही मृत्यूची चाहूल असते. ही फार सामान्य बाब आहे. ‘मृत्यूचा आवाज’ नावाने ओखळला जाणारा हा आवाज फार सामान्य असून रुग्ण प्राण साेडण्याआधी हा आवाज माझ्या कानावर पडताे. मात्र, तुम्ही असा आवाज यापूर्वी कधी ऐकला नसेल, तर तुम्हाला ताे फारच भयानक आणि भयावह वाटू शकताे, असं ज्युलीने तिच्या फाॅलाेअर्सला सांगितलं आहे.मृत्यूसंदर्भात अनेक गैरसमज असल्याने ज्युलीने मृत्यूचा आवाज हा वेदनांमुळे येत नाही. आपल्या शरीरामध्ये 24 तास लाळ तयार हाेत असते. आपला मेंदू ही लाळ गिळण्यास सांगत असताे.मात्र मृत्यू जवळ येताे तेव्हा ताेंडात लाळ तयार हाेत असते. मात्र मेंदू ही गिळण्याची सूचना करत नाही. मृत्यू जवळ आलेल्या व्यक्तीचे स्नायू कमकुवत हाेतात.
 
त्यामुळेच व्यक्तीला काहीही गिळता येत नाही. एखादी व्यक्ती बेशुद्ध पडली तरी तिचं ताेंड उघडलेलं असतं. यामागील कारणही स्नायू कमकुवत हाेणं हेच आहे, असं ज्युलीने सांगितलं.अशा स्थितीमध्ये ताेंडात तयार झालेली लाळ साचून राहते आणि आयुष्याच्या शेवटच्या घटका माेजत असलेली व्यक्ती ताेंडाने श्वास घेण्याचा प्रयत्न करते.अशावेळी गुळण्या करत असल्यासारखा ‘गळ्.. गळ्... गळ्...’असा आवाज येताे. अनेकदा मृत्यूच्या काही क्षण आधी व्यक्तीच्या घशातून हा निघताे. लाेकांना हा आवाज ऐकू येताे; पण ताे कुठून येत आहे हे समजत नाही. एका सामान्य गैरसमजानुसार अनेकांना हा आवाज फुप्फुसांमधून येताे असं वाटतं.
 
कधी कधी आम्ही रुग्णाचं ताेंड काेरडं करण्यासाठी औषधांचा वापर करताे, असं ज्युली म्हणाली. काहींना खाटेवर आडवंहाेण्यास सांगून, तर काहींना कूस बदलून हा आवाज राेखण्याचा प्रयत्न आम्ही करताे. लाळ रुग्णाच्या ताेंडातून बाहेर पडावी हा एकमेव उद्देश असताे. ही लाळ सक्शन करून ओढून काढली जात नाही.कारण असं केलं तर अधिक लाळ तयार हाेते, असंही ज्युलीने सांगितलं.पहिल्यांदा हा मृत्यूचा आवाज ऐकणं फार भीतिदायक अनुभव असताे. त्यामुळे याबद्दलची माहिती असणं फायद्याचं ठरतं.
ही फार सामान्य बाब आहे. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर घडणारी ही घटना समान्य आहे, हे मला या व्हिडिओतून सांगायचं आहे. हा आवाज आपल्याला मानसिक धक्का देऊन जाताे, असं अनेकांनी म्हटलं आहे. त्यामुळेच मी हा व्हिडीओ तयार केला आहे. अनेकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया नाेंदवल्यात.