दाक्षिणात्य चित्रपट कलाकारांचे उत्पन्नाचे स्राेत

    19-Mar-2024
Total Views |
 
 

Movie 
त्यामुळे अनेक दाक्षिणात्य कलाकार व इतर तंत्रज्ञांना प्रेक्षक ओळखू लागले. अर्थात, त्याआधीही रजनीकांत, कमल हासन, चिरंजीवी अशा दाक्षिणात्य अभिनेत्यांचे हिंदी चित्रपट यशस्वी ठरत हाेतेच. पण मूळ दाक्षिणात्य भाषेत असणारे व हिंदीत डब केलेले चित्रपट पाहण्याचं वेड बाहुबलीने लावलं आणि अभिनेता प्रभास, दिग्दर्शक एस. एस. राजामाैली ही नावं हिंदी प्रेक्षकांच्या परिचयाची झाली. त्यातून मग दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीविषयी उत्सुकता वाढत गेली. दक्षिण भारतीय चित्रपट उद्याेग हा देशातील सर्वात माेठा आणि किफायतशीर चित्रपट उद्याेगांपैकी एक आहे, ज्यात असंख्य प्रतिभावान कलाकार आहेत व त्यांचे चाहते माेठ्या प्रमाणावर आहेत. हे कलाकार चित्रपटासाठीच्या मानधनाबराेबरच अन्य स्राेतातूनही बक्कळ कमाई करत असतात. दाक्षिणात्य अभिनेते व अभिनेत्री त्यांच्या चित्रपटांमधील भूमिकांसाठी जास्त फी घेतात.
 
त्यांची लाेकप्रियता, मागणी आणि चित्रपटाच्या बजेटनुसार अनेक काेटींपासून ते शंभर काेटींपर्यंत हे मानधन असते. कलाकारांना चित्रपटाने केलेल्या नफ्याची टक्केवारी देखील मिळू शकते.चित्रपटांव्यतिरिक्त, विविध उत्पादनांच्या जाहिराती आणि साेशल मीडियावर स्पाॅन्सरशिप हादेखील या अभिनेत्यांच्या उत्पन्नाचा आणखी एक महत्त्वाचा स्राेत आहे.दक्षिण भारतीय चित्रपट उद्याेगातील बड्या कलाकारांना माेठ्या कंपन्या त्यांच्या ब्रँडसचा साेशल मीडियावर प्रसार व प्रचार करण्यासाठी या अभिनेत्यांचा उपयाेग करून घेतात. साेशल मीडियावर ब्रँडचा प्रचार करण्यापासून ते जाहिरातींमधील उत्पादनाचा चेहरा बनण्यासाठीच्या कामासाठी त्यांना भरपूर माेबदला मिळताे. या जाहिरातींसाठीची फी अनेकदा जास्त असते आणि ती अभिनेत्याच्या लाेकप्रियतेवर अवलंबून असते.
 
दक्षिणेतील कलाकारांचा स्वतःचा एक चाहता वर्ग असताे. त्यामुळे साेशल मीडियावर ब्रँड प्रमाेशन करण्यासाठी त्यांना चांगले पैसे मिळतात.त्याखेरीज विविध कार्यक्रम, प्राॅड्नट लाॅन्च, ब्रँड अँबेसिडर, इव्हेंन्टमधील उपस्थिती यातून ते पैसे कमावतात. यातील अनेकांनी या पैशातून विविध ठिकाणी प्राॅपर्टी खरेदी केलेल्या आहेत.त्याचेही भरभक्कम भाडे त्यांना मिळत असते.त्याखेरीज अनेक अभिनेत्यांनी स्वतःची प्राॅड्नशन हाऊस निर्माण केली आहेत. त्याद्वारे ते चित्रपट व मालिकांची, विविध शाेजची निर्मिती करत असतात व त्यातूनही कमाई करत असतात.