महिला वर्गाची स्पाेर्ट्स युटिलिटी व्हेइकल्सना वाढती पसंती

    17-Mar-2024
Total Views |
 
 
 


car
 
 
‘स्पाेर्ट्स युटिलिटी व्हेइकल’ (एसयूव्ही) खरेदी करणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढते आहे. गेल्या पाच वर्षांत यात 4.5 पट वाढ झाल्याची माहिती उद्याेग जगतातील सूत्रांनी दिली.जमिनीपासून जास्त उंची (हाय ग्राउंड ्निलअरन्स) आणि उंचावरील आसनव्यवस्था हे ‘एसयूव्हीं’चे वैशिष्ट्य असते. अन्य वाहनांपेक्षा ही वाहने जास्त मजबूतही असतात. 2018मध्ये अशा प्रकारची 29 हजार वाहनांची (युनिट्स) विक्री झाली हाेती आणि 2023मध्ये ही संख्या 1 लाख 25हजारावर गेल्याचे सूत्रांनी सांगितले.ही वाहने खरेदी करणाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसते. मुंबईतील एक बँकर साेनल देशमुख यांनी त्यांची 15 वर्षे जुनी मिड-साइज सेडान वर्गातील गाडी बदलून नवीन वाहन घेण्याचे ठरविले. गेल्या महिन्यात त्यांनी एका नामवंत कंपनीची टाॅप-एण्ड मिड-साइज ‘एसयूव्ही’ गाडी घेतली. ‘वाहतुकीच्या गर्दीतून सेडानप्रमाणे चालविण्यासही ती सुलभ हवी हाेती आणि रस्त्यांवरील खड्ड्यांतून ती व्यवस्थित जाणारी हवी हाेती. माझ्या या सगळ्या गरजा या मिड-साइज एसयूव्हीने पूर्ण केल्या आहेत. वीकेंडला कुटुंबीयांसह बाहेर जाण्याससुद्धा ही गाडी उपयुक्त आहे,’ असे साेनल देशमुख यांनी सांगितले.
 
‘ई-एसयूव्ही’ गाड्या घेण्याचे प्रमाण महिलांमध्ये वाढत असल्याचे कार विक्रेत्यांचे निरीक्षण आहे.टाटा ने्नसाॅन.ईव्ही गाड्यांच्या खरेदीत महिलांचा वाटा 22 टक्के असून, इंटरनल कम्बशन इंजीन असलेल्या ने्नसाॅन गाड्यांच्या खरेदीत ताे 15 टक्के आहे. इले्निट्रक व्हेइकल्सच्या विक्रीत टाटा माेटर्स अव्वल असून, माॅरिस गॅरेज (एमजी) ही कंपनी दुसऱ्या स्थानी आहे. या कंपनीच्या विक्रेत्यांचा अनुभवही असाच दिसताे. सध्या या कंपनीच्या गाड्यांच्या एकूण विक्रीत महिलांचे प्रमाण 15 टक्के आहे. मात्र, ईव्ही वर्गातील वाहनांच्या खरेदीत ताे जास्त दिसताे. ‘एमजीच्या एमजी झेडएस ईव्ही आणि एमजी काॅमेट या वाहनांच्या खरेदीत महिलांचे प्रमाण 24 टक्के आहे,’ असे एमजी माेटर इंडियाचे उप व्यवस्थापकीय संचालक गाैरव गुप्ता यांनी सांगितले. ‘सध्याच्या काळात महिला माेठ्या प्रमाणात नाेकरी करायला लागल्याने कार घेऊन ती वापरणे वाढते आहे. एवढे दिवस त्या प्रामुख्याने सेडान किंवा हॅचबॅक वर्गातील गाड्या घेत हाेत्या. पण, आता त्या एसयूव्हीसुद्धा घेऊ लागणे हे त्यांच्यातील वाढत्या आत्मविश्वासाचे प्रतीक आहे,’ असे मारुती सुझुकी इंडियाचे सिनिअर ए्निझ्नयुटिव्ह ऑफिसर शशांक श्रीवास्तव यांना वाटते. प्रिमियम आणि काॅम्पॅ्नट ‘एसयूव्ही’ गाड्यांना महिलांची पसंती जास्त दिसते.