तिने दुसरे लग्न केले अनआधीच्या पतीलाही सासरी नेले

    17-Mar-2024
Total Views |
 
 
 


Marriage
 
 
एका महिलेने सासरी जाण्यापूर्वी एक विचित्र अट घातली. या महिलेने पतीला एक अट घातली, की तिचा ‘ए्नस-पती’ तिच्यासाेबत राहायला आला तरच ती सासरी येईल.38 वर्षीय ख्रिसचा विवाह 36 वर्षीय जेम्स आर्मस्ट्राँगबराेबर झाला हाेता. लग्नापूर्वी ख्रिसने एक अट घातली हाेती, की ती लग्नानंतर तिचा बालपणीचा मित्र आणि पहिला पती ब्रेंडनला बराेबर घेऊन येईल. आणि विशेष म्हणजे जेम्सनेही ते लगेच मान्य केले. ताे त्याची पत्नी ख्रिसवर अतिशय प्रेम करताे आणि आता हे जाेडपे ब्रेंडनचे कायदेशीर पालक बनले आहे.
 
वास्तविक, ख्रिस आणि ब्रेंडनचे 2006 मध्ये लग्न झाले आणि त्यानंतर लगेचच, ब्रेंडनला कार अपघातात मेंदूला दुखापत झाली आणि ताे काेमात गेला. ताे बऱ्याच काळानंतर बरा झाला; पण त्याला मानसिक आणि शारीरिक अपंगत्व आले.अशा परिस्थितीत ख्रिसने घटस्फाेट घेण्याचा विचार केला, परंतु ब्रेंडनला अशा परिस्थितीत एकटे टाकणे तिला पसंत नव्हते, म्हणून ख्रिसने त्याची काळजी घेण्याचे ठरवले. तिने दुसरे लग्न केले. विशेष म्हणजे तिच्या या पतीनेही तिला साथ दिली आणि आता ते दाेघेही ब्रेंडनची काळजी घेत संसार करीत आहेत.