महावितरणने ग्राहकाभिमुख सेवेसाठी एआयचा वापर करावा

    17-Mar-2024
Total Views |
 
 

AI 
 
 
ग्राहकाभिमुख सेवा देण्यासाठी महावितरणने नवनवीन उपक्रम, याेजना राबवण्यास प्राधान्य दिले आहे. महावितरणने आपल्या ग्राहकांना गुणवत्तापूर्ण व ग्राहकाभिमुख सेवा देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या (एआय) माहिती तंत्रज्ञानाचा वापर करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.महाडिस्काॅमने विकसित केलेल्या चॅटबाॅटचे फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात लाेकार्पण करण्यात आले, त्यावेळी ते बाेलत हाेते. या कार्यक्रमास अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लाेकेश चंद्र, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डाॅ.श्रीकर परदेशी, महावितरणचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक, महावितरणचे संचालक अरविंद भादीकर, प्रसाद रेशमे आणि याेगेश गडकरी उपस्थित हाेते.ग्राहकांना दर्जेदार आणि पुरेसा वीजपुरवठा या मूलमंत्रावर महावितरणचे कामकाज सुरू आहे.
 
तक्रारनिवारण, बिलभरणा, नवीन वीजजाेडणी अशा विविध कामांसाठी ग्राहकांना मदत करणारे हे ऊर्जा चॅटबाॅट उपयु्नत ठरेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्य्नत केला. ऊर्जा चॅटबाॅटमुळे ग्राहकांना कार्यालयात येण्याची गरज राहणार नाही. 24 तास सेवा उपलब्ध असल्याने त्यांना साेयीनुसार सेवेचा लाभ घेता येईल; तसेच ग्राहकांना आता महानगर क्षेत्रात तीन दिवसांत, शहरी भागात सात दिवसांत आणि ग्रामीण भागात 15 दिवसांत वीजजाेडणी मिळत आहे, ही आनंदाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.महावितरणची वेबसाइट आणि अ‍ॅपवर हे चॅटबाॅट उपलब्ध आहे. महावितरणशी संबंधित ग्राहकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी या चॅटबाॅटमध्ये सुविधा आहे. ग्राहकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे चॅटबाॅटद्वारे दिली जातात व त्यातून ग्राहकांना मार्गदर्शन हाेते. ग्राहकांना त्वरित प्रतिसाद तसेच जलद आणि कार्यक्षम सुविधा प्रदान करणे, ही या चॅटबाॅटची वैशिष्ट्ये आहेत.