अचूक हवामान अंदाजासाठी आता विंड्स कार्यक्रम

    14-Mar-2024
Total Views |
 

weeds 
 
 
या कार्यक्रमांतर्गत दाेन लाखांपेक्षा जास्त अद्ययावत ग्राउंड स्टेशन्स स्थापणारकाेणत्याही देशाच्या प्रगतीसाठी हवामानाचा अचूक अंदाज महत्त्वाचा असताे. हवामानाचा दीर्घकालीन अंदाज घेण्यासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग आणि कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने ‘वेदर इन्फाॅर्मेशन नेटवर्क अँड डेटा सिस्टीम’ (विंड्स) हा कार्यक्रम सुरू केला आहे. भाैगाेलिक स्थितीवर हवामान अवलंबून असले, तरी त्याचा अचूक अंदाज महत्त्वाचा असताे. शेतीसाठी तर सर्वांत कळीचा मुद्दा असल्याने फार पूर्वीपासून हवामानाचा अंदाज वर्तविला जाताे आहे. पाऊस, चक्रीवादळे, उष्णतेच्या लाटा आणि दुष्काळासारख्या घटनांचा आधीच अंदाज आला, तर संभाव्य हानी टळते आणि मदतीसाठी आपत्कालीन यंत्रणाही सज्ज ठेवता येते.हवामानाच्या अंदाजासाठी आपल्याकडे भारतीय हवामान शास्त्र विभाग (आयएमडी) ही प्रमुख सरकारी संस्था असून, ती दरराेज माहिती प्रसिद्ध करते.
 
सध्याच्या काळात संगणक, विविध माॅडेल्स आणि कृत्रिम उपग्रहांच्या मदतीमुळे हवामानाचा अंदाज खूप अचूक देता येताे. हवामान हा घटक अत्यंत गुंतागुंतीचा असल्याने त्याचा अगदी अचूक अंदाज देणे फार कठीण असते, हे लक्षात ठेवले पाहिजे.भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशात तर हवामानातील वैविध्य जास्त असल्याने हवामानाबाबतचे अंदाज अचूक वर्तविणे कठीण असे. मात्र, गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञानाच्या मदतीमुळे ‘आयएमडी’चे अंदाज खूपच अचूक हाेऊ लागले आहेत. अमेरिका, ब्रिटन आणि जपानसारख्या प्रगत देशांत यासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान आता आपल्याकडेही येणे हे त्याचे कारण. मात्र, भारतासारख्या अवाढव्य देशातील भाैगाेलिक स्थितीमुळे हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळा या ऋतूंमधील हवामानाचे अंदाज काही दिवस चुकत असल्याचे दिसले आहे.
 
त्याचे एक मुख्य कारण म्हणजे, हवामानाचा अंदाज देणाऱ्या जमिनीवरील स्टेशन्सची (वेदर माॅनिटरिंग ग्राउंड स्टेशन्स) कमतरता. हवामानाच्या अंदाजासाठी स्वयंचलित स्वरूपाची (अ‍ॅटाेमेटिक वेदर स्टेशन्स-एडब्ल्यूएस) 800 स्टेशन्स, 1,500 अ‍ॅटाेमेटिक रेन गेजेस (एआरजी) आणि 37 डाॅप्लर वेदर रडारचा (डीडब्ल्यूआर) वापर ‘आयएमडी’ सध्या करते. मात्र, अचूक अंदाजासाठी तीन लाखांपेक्षा जास्त ग्राउंड स्टेशन्स (एडब्ल्यूएस/ एआरजी) आणि सुमारे 70 डाॅप्लर वेदर रडारची गरज आहे.भारतात अनेक राज्य सरकारे आणि खासगी कंपन्यांकडेही ग्राउंड स्टेशन्सचे नेटवर्क असून, ही संख्या सुमारे 20 हजारांपेक्षा जास्त आहे. त्यातील अनेकांचा वापर ‘आयएमडी’ सध्या करत नाही.डेटापर्यंत पाेहाेचता न येणे आणि त्यांच्या विश्वासार्हतेबाबत शंका अशी कारणे त्यात आहेत.
 
आधुनिक यंत्रणेचा अभाव : हवामानाच्या अंदाजासाठी सध्या वापरली जाणारी बहुसंख्य साॅफ्टवेअर्स जागतिक अंदाज पद्धतीवर (ग्लाेबल फाेरकास्ट सिस्टीम) तसेच हवामान संशाेधन आणि अंदाजाच्या माॅडेल्सवर आधारित आहेत. ही दाेन्ही माॅडेल्स फार अत्याधुनिक नाहीत. कृषी आणि हवामान क्षेत्रांत माेठ्या प्रमाणातसरकारी आणि खासगी गुंतवणुकीसाठी सरकार स्टार्ट-अप्सना प्राेत्साहन देत असल्याने नव्या काळातील अनेक कंपन्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि मशीन लर्निंग (एमएल) या तंत्रज्ञानांचा वापर हवामानाच्या अंदाजासाठी करत आहेत. मात्र, त्यांच्याकडे असलेल्या डेटाचे विश्लेषण करण्यासाठीच ते उपयुक्त ठरते.
त्यासाठी एक सर्वंकष यंत्रणा (इंटिग्रेटेड सिस्टीम) तयार करण्याची गरज आहे. या साठी कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग आणि कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने ‘वेदर इन्फाॅर्मेशन नेटवर्क अँड डेटा सिस्टीम’ (विंड्स) हा कार्यक्रम सुरू केला असून, हवामानाचा ‘हायपर-लाेकल’ डेटा मिळवणे हा त्याचा उद्देश आहे. कृषीसह अन्य क्षेत्रांनाही त्याचा उपयाेग हाेणार असून, सर्व डेटा उपलब्ध हाेईल. या कार्यक्रमांतर्गत देशभरात दाेन लाखांपेक्षा जास्त ग्राउंड स्टेशन्स (एडब्ल्यूएस आणि एआरजी) स्थापन केली जाणार असून, त्यामुळे हवामानाची पुरेशी माहिती मिळून अंदाज अधिक अचूक वर्तविणे श्नय हाेईल.
 
धु्नयाच्या स्थितीतही फायदा : राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात गेल्या महिन्यात दाट धु्नयाच्या थरामुळे शून्य दृश्यतेची (झीराे व्हिजिबिलिटी) स्थिती निर्माण झाली हाेती. वातावरणातील वाढलेले सूक्ष्म कण (हाय पर्टि्नयुलर मॅटर) आणि धुर्नयामुळे (स्माॅग) असे झाले हाेते. धु्नयामुळे प्रदूषणकारी घटक जमिनीलगत राहून श्वसनयंत्रणेसह अन्य आराेग्यविषयक प्रश्न निर्माण हाेतात. धु्नयामुळे नायट्राेजन ऑ्नसाइड्ससारख्या प्रदूषणकारी घटकांचा अन्य घटकांबराेबर संयाेग हाेऊन हवेची गुणवत्ता अधिक बिघडते आणि त्याचा त्रास लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांना हाेताे. हवेच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवणारी यंत्रणा महाग असून, ती परदेशांतून आयात करावी लागते. मात्र, ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत अनेक भारतीय कंपन्या अशी यंत्रणा तयार करू लागल्या आहेत. त्यात सेन्सरवर आधारित सिस्टीमचा समावेश आहे. या यंत्रणा कमी खर्चाच्या आणि लावण्यास सुलभही आहेत. त्यांचा देखभाल खर्चही अल्प असल्यामुळे शहरी भागांत अशी यंत्रणा बसविणे श्नय आहे.