परीक्षेत यशस्वी हाेण्यासाठी मुलांना हवी पालकांची साथ

    14-Mar-2024
Total Views |
 
 

childrens 
 
 
काेणाला प्रेरीत करणे आणि आपले लक्ष्य मिळविण्यासाठी त्याच्यात सातत्याने मेहनत करण्याचा उत्साह कायम ठेवणे साेपे काम नाही. परीक्षा जवळ आलेल्या असतात. आपल्या मुलांच्या शैक्षणिक वर्षातील सर्वात अवघड काळात त्यांना तुमच्या प्राेत्साहनाची गरज असते. तुम्ही साथ देण्याची गरज असते. तुमच्या प्रेमाची गरज असते. घरी अभ्यासासाठी अनुकूल वातावरण असल्यास त्यामुळे येणाऱ्या वार्षिक परीक्षेत त्याला आपली सर्वश्रेष्ठ कामगिरी करण्यासाठी प्रेरणा देता येऊ शकेल.
 
संवादाचे माध्यम खुले ठेवा : ्निलनिकल सायकाॅलाॅजिस्ट डाॅ. शालिनी सिंह म्हणतात की, ‘मुलांबराेबर संवादाचे माध्यम नेहमी खुले ठेवा. असे केवळ परीक्षांच्या आधीच करू नका, तर त्याची सवय सुरुवातीपासूनच लावा. मुलांबाबत काेणती समस्या नसते.खरी समस्या शिक्षक आणि पालक यांच्याबाबत असते.मुलांवर परीक्षेत चांगले मा्नर्स मिळविण्यासाठी दबाव आणनका. त्यांच्याबराेबर मैत्रीपूर्ण वागणे ठेवा. अभ्यास आणि परीक्षा यांचे महत्त्व समजावून सांगा आणि त्यांची तयारी करून घ्या. मुलांबाबत आपली जबाबदारी पार पाडा.’
 
वेळापत्रक तयार करा : ही खूप चांगली गाेष्ट आहे, की तुमचा मुलगा चांगला वागताे. पण अशा वेळी जेव्हा एका सेकंदात लक्ष विचलित हाेईल, तेव्हा आवश्यक आहे, की तुम्ही तुमच्या मुलासाठी एक वेळापत्रक तयार करा. मुलाबराेबर बसा आणि त्याच्या अभ्यासासाठी आणि आवश्यक रिव्हिजनसाठी वेळापत्रक बनवा. एका संशाेधनानुसार मुले 40-45 मिनिटांपर्यंत लक्षपूर्वक वाचू शकतात. त्यामुळेच बहुतांश शाळा आणि काॅलेजमध्ये काेणतेही ले्नचर याच कालावधीचे असते.वेळापत्रक तयार करताना या गाेष्टीची काळजी घ्या.45 मिनिटे लक्षपूर्वक अभ्यास करण्यासाठी निश्चित करा आणि 10 मिनिटांची वेळ ब्रेक घेण्यासाठी ठेवा.
 
खेळण्याची वेळ ठरवा : मुलांना खेळण्यासाठी वेळ द्या. पण हेसुद्धा लक्षात ठेवा, की मुलगा त्यावेळी करत काय आहे? तुम्ही तयार केलेल्या टाइमटेबलमध्ये दर आठवड्याला कमीत कमी तीन दिवस इनडाेअर आणि आउटडाेअर खेळांसाठी असावेत. परीक्षेच्या वेळी अशी मुले ज्यांना खेळ खेळणे, संगीत इत्यादी आवडते, ते आपल्या आवडीला पूर्णपणे विसरतात.ज्या प्रकारे मुले खेळल्यानंतर थकतात, त्याचप्रकारे ते अभ्यास केल्यानंतरही थकतात. अर्धा तास खेळल्यानंतर मुलांना ऊर्जा मिळाल्यासारखे वाटते. त्याबराेबरच मेंदूला पुरेशा प्रमाणात ऑ्निसजन मिळताे. त्यामुळे मेंदू ताजातवाना आणि जागरूक राहताे. या ब्रेकच्या दरम्यान मुलांना टीव्हीसमाेर वेळ वाया घालवू देऊ नका. त्याऐवजी त्यांना काॅमिक बुक वाचण्यास किंवा खेळण्यासाठी प्राेत्साहन द्या.
 
घरातील वातावरण अनुकूल असावे : माेठेमाेठे चॅप्टर वाचणे आणि लक्षात ठेवणे, मुलांच्या शिकण्याच्या क्षमतेला प्रभावित करते. एक पालक म्हणून मुलांच्या अभ्यासासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याची तुमची जबाबदारी आहे. अभ्यासाला साेपे बनविण्यासाठी त्यांना आरामदायक वातावरण उपलब्ध करून द्या. काही मुलांना शिकण्याच्या दरम्यान थकवा येताे.त्यांच्या आवडीचे संगीत वाजविल्याने त्यांच्या मेंदूला आराम मिळू शकताे. यामुळे थकवा कमी हाेताे, तसेच एकाग्रतासुद्धा वाढते. संगीताच्या नावावर आयटम नंबर वाजविण्याची चूक करू नका. त्याशिवाय तुम्ही राेज रात्री झाेपण्याआधी मुलाच्या डाे्नयाला बदामाच्या तेलाने मालिश करू शकता.
 
मुलांना साथ द्या : काउंसलर नेहमी सांगत आले आहेत की, परीक्षा मुलांसाठी एक तणावपूर्ण कालावधी असताे. एक पालक म्हणून तुम्ही मुलांना साथ द्यायला हवी. त्यांचे ओझे वाढविता कामा नये. मुलांनी लपविण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी या वेळी त्यांना तुमची सर्वात जास्त गरज असते.तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार ही वेळ त्यांचे म्हणणे ऐकण्याची असते, त्यांना सल्ला देण्याची नाही. जर तुम्ही मुलांच्या परीक्षेसाठी ऑफिसमधून सुट्टी घेतली असेल, तर असा प्रयत्न करा की, तुम्ही त्यांना मदत करणारे ठराल आणि त्यांना ओझे वाटणार नाहीत. घरात शांततेचे वातावरण ठेवून तुम्ही त्यांना मदत करू शकता. कधीही त्यांची भाऊ- बहीण, मित्रांशी त्यांची तुलना करू नका. तसेच चाेवीस तास त्यांच्यावर अभ्यास करण्याचा दबाव आणू नका.