समृद्धी महामार्ग राज्याची भाग्यरेषा ठरणार : छगन भुजबळ

    13-Mar-2024
Total Views |
 
 

Highway 
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग राज्याची भाग्यरेषा ठरणार आहे. असा विश्वास अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.समृद्धी महामार्गावरील भरवीर ते इगतपुरी या तिसऱ्या टप्प्याचे नांदगाव सदाे येथील इगतपुरी पथकर प्लाझा येथे लाेकार्पण करताना भुजबळ बाेलत हाेते. केंद्रीय आराेग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डाॅ. भारती पवार, नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे, राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी अनिलकुमार गायकवाड आदी मान्यवर यावेळी उपस्थित हाेते.समृद्धी महामार्ग शेतमालाची वाहतूककरण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. या महामार्गावर वाहने चालवताना नियमांचे पालन करणे आवश्यक असून, त्यासाठी एक दाेन दिवसांचे प्रशिक्षण देण्याची गरज भुजबळ यांनी व्यक्त केली.
 
समृद्धी महामार्ग सरळ व साेपा असून, मुंबई ते नागपूर या मुख्य शहरांसाेबतच 15 जिल्ह्यांना जाेडणाऱ्या या महामार्गामुळे वेळेची बचत हाेणार आहे, असे डाॅ.पवार यांनी सांगितले.मुंबई ते नागपूरदरम्यान असणाऱ्या 701 कि.मी.च्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या कामांपैकी 625 कि.मी. रस्त्याचे काम पूर्ण झाले असून, तिसऱ्या टप्प्यातील भरवीर ते इगतपुरी या 25 कि.मी.रस्त्याचे लाेकार्पण करण्यात आले आहे. या महामार्गाच्या माध्यमातून पर्यटन व तीर्थस्थळे जाेडली जाणार आहेत. समृद्धी महामार्गावर अपघात, दुर्घटना टाळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयाेग करण्यात आला आहे. या महामार्गाचा वापर करताना वाहनधारकांनी वाहतुकीच्या नियमांचे व वाहनाच्या वेगाचे पालन करावे, असे भुसे यांनी सांगितले.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते फीत कापून महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे लाेकार्पण करण्यात आले. त्यानंतर काेनशिलेचे अनावरण करण्यात आले. गायकवाड यांनी प्रास्ताविक केले.