डॉक्टरांच्या काैशल्याला तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापराचे आव्हान

    13-Mar-2024
Total Views |
 
 
 

Doctor 

क्लिनिकल तपासणी आणि हिस्टरी-टेकिंगचे प्रमाण आता खूप घटले आहे कशाचाही अतिवापर शेवटी त्रासदायक ठरताे. तंत्रज्ञानामुळे जीवन सुलभ झाले असले, तरी त्यावरच सतत अवलंबून राहण्यामुळे आपण आपली अनेक काैशल्ये गमावत चाललाे आहाेत. वैद्यकीय क्षेत्रही त्याला अपवाद नाही. तंत्रज्ञानाच्या माेठ्या वापरामुळे डाॅ्नटरही त्यांची काैशल्ये विसरतात की काय, असा प्रश्न येताे. शल्यविशारदांच्या नुकत्याच झालेल्या एका परिषदेत एका व्नत्याने याकडे लक्ष वेधले. ‘सध्या हाेत असलेल्या जवळपास 80 टक्के शस्त्रक्रिया काॅम्प्युटरच्या मार्गदर्शनानुसार (काॅम्प्युटर नेव्हिगेशन) अथवा राेबाेटमार्फत हाेतात,’ असे ते म्हणाले. ‘एखाद्या दिवशी काॅम्प्युटर नेव्हिगेशन अथवा राेबाेट उपलब्ध नसेल, तर तुमच्यातील किती जण त्या दिवशी शस्त्रक्रिया रद्द करतील?’ असा प्रश्नही या सर्जन व्नत्याने केला.
 
राेगनिदान करण्यासाठी फार पूर्वीपासून डाॅ्नटर त्यांचा मेंदू आणि हातांवर माेठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी महाविद्यालयात दाखल झाल्यापासून या व्यवसायातून निवृत्त हाेईपर्यंत त्या डाॅ्नटरांच्या मेंदूमध्ये विविध वैद्यकीय घटनांची नाेंद झालेली असते. विविध विकारांच्या लक्षणांपासून त्यांच्या निदानाच्या पद्धती आणि नवीन अद्ययावत ज्ञान यांचा त्यात समावेश हाेताे. म्हणजे, एखाद्या गाेदामाप्रमाणे (स्टाेअरहाउस) मेंदूमध्ये माहिती साठलेली असते. या माहितीच्या आधारे विकाराचे निदान केले जाते, आवश्यक त्या तपासण्या करण्यास सांगितले जाते आणि उपचार केले जातात.या ज्ञानाबराेबरच ्निलनिकल ए्नझामिनेशन काैशल्यावरही डाॅ्नटरांचे यश अवलंबून असते. स्पर्श, रुग्णाचे चालणे, हात हलविणे आणि पायांच्या हालचालींचे बारीक निरीक्षण करणे यात येते.
 
दुखऱ्या अवयवाची चाचपणी, रुग्णाचे डाेळे, ताेंडआणि बाेटांची तपासणी करावी लागते. स्टेथाेस्काेप, टेण्डन हॅमर आणि रेटिनाेस्काेपसारख्या उपकरणांचा वापर करावा लागताे.रुग्णाला विचारलेले प्रश्न आणि या तपासण्यांमधून बहुसंख्य विकारांचे बऱ्याच अचूकतेने निदान करता येते. काही माेज्नया तपासण्याही करता येतात. पूर्वीच्या डाॅ्नटरांकडे अशी ्निलनिकल काैशल्ये हाेती. एखाद्या रुग्णाला आपल्या ्निलनिकमध्ये चालत येत असल्याचे पाहून आणि त्याला काही प्रश्न विचारून असे डाॅ्नटर विकाराचे निदान करत असत.
 
चाचण्यांची मालिका : तंत्रज्ञानाच्या विकासाबराेबरच विकारांचे अधिक अचूक निदान करणारी नवीन गॅजेट्सही वैद्यकीय क्षेत्रात येऊ लागली. त्यात क्ष-किरण तपासणी (ए्नस-रे ए्नझामिनेशन), अल्ट्रासाउंड स्कॅन, रक्तचाचण्यांची मालिका, काॅम्प्युटराइज्ड टाेमाेग्राफी (सीटी) स्कॅन, मॅग्नेटिक रेझाेनान्स इमेजिंग (एमआरआय), बाेन स्कॅन्स आदींचा समावेश असून, ही यादी वाढते आहे. परवडणाऱ्या किमतीमुळे अधिकाधिक डाॅ्नटर आणि रुग्णांना विकारांच्या निदानासाठी या गॅजेट्सचा उपयाेग हाेऊ लागला. दुर्गम भागांतही ते तंत्रज्ञान पाेहाेचू लागले आहे.या गॅजेट्समुळे ‘निदान’ करणे साेपे झाल्यामुळे डाॅ्नटरांना उपयाेग हाेऊ लागला. मेंदूला ताण देऊन रुग्णाबराेबर वेळ घालविण्यापेक्षा ‘डायग्नाेस्टिक गॅजेट्स’वर अवलंबून राहणे डाॅ्नटरांना फायद्याचे ठरायला लागले. रुग्णांच्या वाढत्या अपेक्षा, लवकर आणि अचूक निदान याचाही याला हातभार लागला.