एप्रिलपासून मुंबईत झिराे प्रिस्किप्शन पाॅलिसी

    11-Mar-2024
Total Views |
 

CM 
 
मुंबईतील वरळी भागातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी दवाखान्याची पाहणी करतानाच तपासणीसाठी आलेल्या रुग्णांशीही संवाद साधला.मुंबईकरांचा आराेग्य उपचारांवरील खर्च कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आराेग्य आपल्या दारी माेहीम सुरू करण्यात आली असून, या माेहिमेतून घराेघरी जाऊन आराेग्यतपासणी करण्यात येणार आहे.एप्रिलपासून झिराे प्रिस्क्रिप्शन पाॅलिसी सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.वरळीतील अभियांत्रिकी संकुलातील आपला दवाखान्यात मुख्यमंत्र्यांचे अचानक आगमन झाले. त्यांनी दवाखान्यातील, स्टाेअर रूम, औषध कक्ष, तपासणी कक्ष, स्वच्छतागृह आदींची पाहणी केली.
 
यावेळी तेथे तपासणीसाठी आलेल्या काही ज्येष्ठ नागरिकांशीमुख्यमंत्र्यांनी संवाद साधत आपला दवाखान्याविषयी अनुभव विचारला. रुग्णांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुंबईकरांना उपचारांसाठी घराजवळच साेय व्हावी, या संकल्पनेतून आपला दवाखाना सुरू करण्यात आला आहे. आतापर्यंत 42 लाख नागरिकांनी त्याचा लाभ घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.मुंबईत आराेग्य आपल्या दारी माेहिमेतून घराेघरी आराेग्यतपासणी केली जाईल. झिराे प्रिस्किपशन पाॅलिसी एप्रिलपासून सुरू हाेणार आहे. त्यासाठी 1500 काेटींची तरतूद केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लाेढा, मुंबई महापालिका आयु्नत इ्नबालसिंह चहल, अतिर्नित आयु्नत वेलारासू, डाॅ. सुधाकर शिंदे आदी उपस्थित हाेते.