आवर्जून भेट द्यावीत अशी ‘बाली’मधील पाच मंदिरे

    07-Feb-2024
Total Views |
 
 

Temple 
सध्याच्या या पर्यटन माेसमात तुम्ही बाली या देशातील पर्यटनस्थळांना भेट देण्याचे नियाेजन करत असाल, तर येथील पाच मंदिरे अशी आहेत जी पाहताक्षणीच तुम्ही त्यांच्या प्रेमात पडाल.
 
1) बेसाकीह मंदिर (मातेचे मंदिर) : या मंदिराला सहसा ‘बालीचे मंदिर’ म्हणून ओळखले जाते. हे बाली बेटावरील सर्वांत महत्त्वाचे हिंदू मंदिर संकुल आहे. तसेच हजार वर्षांपूर्वीचे जुने आणि प्रसिद्ध मंदिर आहे आणि ते बालीच्या सर्वाेच्च ज्वालामुखी माउंट अगुंगच्या उतारावर आहे. हे बालीनीज आध्यात्मिक आणि धार्मिक केंद्र आहे, ज्यामध्ये टायर्ड मंदिरे आणि मंडपांचा समावेश आहे. बेसाकीह मंदिर त्याच्या सुंदर वास्तुकला, विस्तृत काेरीव काम आणि आजूबाजूच्या भूप्रदेशाच्या अद्भुत दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. हा बालीनीज संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे, जाे अगणित समारंभ आणि धार्मिक उत्सव आयाेजित करताे. त्यामुळे बेटाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशात स्वारस्य असलेल्यांसाठी ते पाहण्यासारखे स्थान बनते.
 
2) तानाह लाॅट मंदिर: नैऋर्त्य किनाऱ्यावर खडकाळ मैदानावर अभिमानाने उभे असलेले बालीचे हे प्रतिष्ठित समुद्री मंदिर आहे. ज्याचा तानाह लाॅट येथील निसर्गसाैंदर्याचा उत्कृष्ट नमुना पाहणे एक नेत्रसुखद अनुभव आहे. भरतीच्या वेळी हे मंदिर हिंद महासागरावर अक्षरशः तरंगताना दिसते. े चित्तथरारक दृश्य डाेळ्यात साठवून घेताना काळजाचा ठाेका चुकताे. एक राेमांचकारी अनुभव या निमित्ताने पर्यटकांना अनुभवता येताे. येथील सूर्यास्त तानाह लाॅटला साेनेरी किरणांचे संध्यास्नान जेव्हा घालताे, तेव्हा ते जादुई वातावरण डाेळ्यात व हृदयात साठवून घेणे, हा एकप्रकारे असीम आनंदाचा क्षण असताे.
 
3) लेम्पुयांग मंदिर (स्वर्गाचे द्वार): स्वर्गाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाणारे पुरा लेम्पुयांग मंदिर शाेधण्यासाठी लेम्पुयांग पर्वताच्या उताराकडील भागापासून वर चढण्यास सुरुवात करा.मंदिराच्या स्प्लिट गेटवर तुम्ही जेव्हा पाेहचता, तेव्हा भव्य माऊंट अगुंगची रचना तुमच्यासाठी आश्चर्यकारक दृश्यांनी परिपूर्ण असा निसर्गाचा चमत्कार घडवतात. या मंदिराचा प्रवास हा केवळ भाैतिक नसून, आध्यात्मिक आहे. हिरवीगार जंगले आणि तुमच्या चढाईसाेबत निर्माण हाेणारे चित्तथरारक दृश्ये तुमची ही अध्यात्मिक यात्रा एक राेमांचक आठवण बनते. या मंदिराच्या उत्कृष्ट स्थापत्य शैलीचा आणि नाट्यमय नैसर्गिक आविष्कारांचा अनुभव घ्या.
 
4) उलुन दानू बेरातन मंदिर" बेदुगलच्या उंच प्रदेशात हे मंदिर दिमाखात उभे आहे. ब्रॅटन सराेवराच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसर पाण्यावर तरंगताना दिसताे. एक मंत्रमुग्ध प्रतिबिंब निर्माण करताे. पाण्याची देवी म्हणून स्थानिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या देवी दानू यांना समर्पित हे मंदिर स्थानिक शेतकऱ्यांसाठी, त्यांच्या पिकांसाठी आशीर्वाद मागणारे श्रद्धास्थान आहे. हिरव्यागार बागांनी आणि थंड पर्वतीय हवेने वेढलेले हे मंदिर बालीच्या नैसर्गिक साैंदर्यातील मानबिंदू ठरते.
 
5) सरस्वती पार्क मंदिर ः तामन सरस्वती मंदिर हे ज्ञान आणि कलांची देवता असलेल्या सरस्वती मातेस समर्पित आहे. गजबजलेल्या उबुदमध्ये शांत वातावरण देणाऱ्या लिली पॅड्सप्रमाणे तरंगणाऱ्या माेहक कमळ तलावातून मार्गक्रमण करत आपल्याला सरस्वती पार्क मंदिरात पाेहचता येते. जवळच्या उबुद पॅलेसमध्ये बालीनीज नृत्य आणि संगीत सादरीकरणात मग्न हाेण्याचा येथील अनुभव सुखद आध्यात्मिक क्षणांची अनुभूती प्रदान करताे.