जेव्हा तुम्ही तामिळनाडूच्या उटी, मुन्नार, काेडाइकनाल अशा लाेकप्रिय हिलस्टेशनांविषयी विचार करता, तेव्हा तुमच्या समाेर हिरव्यागार डाेंगरांचे अनेक सुंदर देखावे येत असतील.पण, तिथे गर्दीही जास्त असते. अशा स्थितीत वट्टाकनाल येथे जाणे एक चांगला पर्याय आहे; जाे काेडाइकनालपासून सुमारे सहा किलाेमीटरच्या अंतरावर आहे. हे भारताचे लहान इस्राईल आहे. जिथे इस्राईलमधील पर्यटकांची संख्या खूप जास्त असते.खरेतर ही जागा हिरवेगार डाेंगर आणि चमकणाऱ्या धबधब्यांच्या मनमाेहक देखाव्यांचा अनुभव घेत खास ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे. इथे तुम्ही एका शांत आणि आरामदायक वातावरणाची अपेक्षा करू शकता. गावातील विचित्र घरे, वळणाचे रस्ते आणि मैत्रीपूर्ण स्थानिक लाेकांना भेटत इथल्या जगाला एका नवीन प्रकाशात पाहा. तुम्हाला मजा वाटेल. आजूबाजूचे डाेंगर, दऱ्या आणि जंगलांची अप्रतिम दृश्ये, याला निसर्गप्रेमी आणि फाेटाेग्राफीचा छंद असणाऱ्यांसाठी एक आदर्श ठिकाण ठरवितात. जर तुम्हाला फाेटाेग्राफीचा छंद असेल, तर येथील माेहक दृश्ये तुम्हाला पसंत पडतील.त्याशिवाय इकाे पाॅइंट, डाॅल्फिन नाेज, सुंदर दृश्य सादर करणारे खडक आणि वट्टाकनाल धबधब्याला सुद्धा जा. इथे भारतीय पासून मॅ्निसकन आणि इटालियनपर्यंत सर्व प्रकारचे भाेजन मिळते.