धनू

    25-Feb-2024
Total Views |
 
 

Horoscope 
 
हा आठवडा तुमच्यासाठी आनंददायी आणि लाभदायक आहे. तुम्ही नव्या कामाची सुरुवात करण्याचा प्रयत्न कराल. बाैद्धिक कामे आणि साहित्य लेखनात सक्रिय राहाल. तीर्थयात्रेला जाण्याची संधी मिळेल. सामाजिक दृष्टिकाेनातून तुमचा मान वाढेल. सामाजिक क्षेत्रात तुमची प्रशंसा हाेईल.
 
नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कार्यस्थळी काहीशी निराशा हाती लागेल. तुमच्या मनात तुमच्या कामाविषयी न्यूनगंड निर्माण हाेऊ शकताे. अशा स्थितीपासून स्वत:ला जपावे आणि धीर साेडू नये. जर तुम्ही या वर्षी भागीत एखादा व्यवसाय सुरू करीत असाल तर त्यात तुम्हाला यश मिळेल.
 
नातीगाेती : या आठवड्यात तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसाेबत तुमच्या एखाद्या नातेवाईकाच्या लग्नात सहभागी हाेण्यासाठी जाऊ शकता. तुम्ही तुमच्या माताेश्रींच्या तब्बेतीकडे लक्ष देण्याचीही गरज आहे. समाजातील प्रतिष्ठित लाेकांसाेबत तुमच्या गाठीभेटी हाेतील आणि त्यामुळे तुमचा मान वाढेल.
 
आराेग्य : या आठवड्यात तुम्ही तुमच्या आराेग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.कारण तुम्हाला आराेग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकताे.विशेषत: पाेटाचे विकार तुम्हाला सतावण्याची श्नयता आहे. जे टाळण्यासाठी तुम्ही बाहेरचे खाणे टाळायला हवे.
 
शुभदिनांक : 25, 29, 2
 
शुभरंग : केशरी, निळा, जांभळा
 
शुभवार : बुधवार, शुक्रवार, शनिवार
 
दक्षता : या आठवड्यात काेणतेही काम गडबडीत न करता शांतपणे करावे.
 
उपाय : या आठवड्यात गुळ-फुटाणे दान करा. ‘ॐ रां रामाय नम:’ मंत्राचा जप करा.