मीन

    25-Feb-2024
Total Views |
 

Horoscope 
 
हा आठवडा तुमच्यासाठी वैचारिक पातळीवर मानसिक व्यग्रता अनुभवणारा आहे. अपेक्षेपेक्षा जास्त भावुक व संवेदनशील राहिल्याने तुमचे मन काहीसे अस्थिर राहील. नव्याने सुरू केलेल्या कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. तुम्ही तुमच्या कार्यस्थळावर असलेल्या कर्मचाऱ्यांसाेबत सलाेख्याने वागायला हवे.
 
 नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात करिअरच्या दृष्टीने काही बदल हाेण्याची श्नयता आहे. नाेकरीच्या संधी येतील पण तुम्ही त्या संधींसाठी तयार राहण्याची गरज आहे. एखाद्या प्रतिष्ठित संस्थेत काम करण्याची संधी मिळू शकते. जर व्यापार करीत असाल तर तुमच्यापुढे आव्हाने उभी राहू शकतात.
 
 नातीगाेती : या आठवड्यात तुमचे मधुर वागणे लाेकांना तुमच्याकडे आकर्षित करील. तुम्ही तुमच्या गाेड बाेलण्याने लाेकांना आपल्या बाजूला वळवण्यात यशस्वी ठराल. मनात कायमस्वरूपी आई-वडिलांविषयी सेवाभावना राहील, त्यांचे आशीर्वादही लाभतील. सासरी मानसन्मान मिळेल.
 
 आराेग्य : या आठवड्यात आराेग्याबाबत अजिबात बेपर्वाई करू नका. कारण तुमचे माेठे नुकसान हाेऊ शकते. आराेग्यात चढ-उताराची स्थिती राहील.यामुळे तुमचे मन काेणत्याही एका गाेष्टीवर केंद्रित राहू शकणार नाही. विषम आहारामुळे तुमची तब्बेत बिघडू शकते.
 
 शुभदिनांक : 26, 27, 1
 
 शुभरंग : जांभळा, हिरवा, निळा
 
 शुभवार : रविवार, बुधवार, शनिवार
 
 दक्षता : या आठवड्यात रागावर ताबा ठेवावा, वादापासून दूर राहावे.
 
 उपाय : या आठवड्यात शिवालयात जाऊन पूजा करावी व शिवलिंगावर अभिषेक करावा.