तूळ

    25-Feb-2024
Total Views |
 
 

Horoscope 
या आठवड्यात तुम्हाला यश, कीर्ति आणि आनंद लाभेल. आर्थिक दृष्ट्या हा आठवडा तुमच्यासाठी उत्तम आहे. तुमच्या कामांच्या विकासासाठी आठवडा फलदायक राहणार आहे. तुम्हाला तुमच्या सहकर्मचाऱ्यांची मदत मिळेल.प्रतिस्पर्धकांना तुम्ही पराजित करू शकाल.
 
 नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात कार्यक्षेत्रातील स्पर्धा तुम्हाला अधिक सक्षम बनवील. विद्यार्थीवर्ग आपल्या अभ्यासात यशस्वी हाेतील.तुम्ही पार्टनरशिपमध्येही व्यापार करू शकता. कार्यक्षेत्रात तुमचे मनाेबल उच्च असेल. तुमच्या व्यापाराची गती जरी संथ असली तरी त्यात सकारात्मकता राहील.
 
 नातीगाेती : या आठवड्यात घरातील माणसांचे तुमच्या कार्यक्षेत्रात पूर्ण सहकार्य राहणार आहे. तुम्ही तुमच्या घरात एखादे धार्मिक अनुष्ठानही करवू शकता. घरातील वडीलधाऱ्या मंडळींचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी असतील.सामाजिक जीवनात तुमच्या कामाचा ओघ वाढेल.
 
 आराेग्य : या आठवड्यात तुम्ही तुमच्या खाण्या-पिण्यावर जास्त लक्ष द्यायला हवे. जडान्न टाळावे कारण तुम्हाला सध्या पाेटाशी संबंधित आजार त्रास देऊ शकतात. मानसिक स्थिती स्थिर राखण्यासाठी तुम्ही याेग व प्राणायामाकडे लक्ष द्यावे. शरीरात पाणी कमी पडू देऊ नये.
 
 शुभदिनांक : 25, 29, 2
 
 शुभरंग : भुरा, पांढरा, निळा
 
 शुभवार : रविवार, साेमवार, बुधवार
 
 दक्षता : रस्त्याने चालताना बेपर्वाई करू नये.
 
 उपाय : या आठवड्यात शंकराला बेल वाहा. ‘ॐ नम: शिवाय’ मंत्राचा जप करा.