सिंह

    25-Feb-2024
Total Views |
 
 

Horoscope 
 
हा आठवडा तुमच्या कलाक्षेत्रातील अभिरूचीत वाढ करणारा असेल. उत्पन्नाच्या खूप संधी चालून येतील. तुम्ही एखाद्या बाैद्धिक वा तार्किक चर्चेत भाग घ्याल.मित्रांची भेट झाल्यामुळे तुमच्या आनंदात भर पडेल. घरात सुख-शांतीचे वातावरण असेल. अर्धवट कामे पूर्ण हाेतील. कलाक्षेत्रात तुमची रूची वाढेल.
 
 नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात तुम्हाला यश मिळण्याची प्रबळ श्नयता आहे. नाेकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा उत्तम आहे. तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात एखादी आनंदाची बातमीही कळू शकते. कामा-धंद्याच्या निमित्ताने तुम्हाला काही काळ घरापासून दूर जावे लागू शकते. ज्यातून फायदाही हाेईल.
 
 नातीगाेती : या आठवड्यात तुम्ही घरातील मंडळींसाेबत एखाद्या मंगलकार्याची रूपरेषा आखू शकता. आई-वडिलांच्या मदतीने एखादे जुने प्रकरण मार्गी लावण्यात तुम्हाला यश मिळेल. त्याचप्रमाणे नातेवाईक मंडळींसाेबत एखाद्या दूरच्या प्रवासाला जाण्याची याेजना तयार करू शकता. प्रेमींच्या जीवनात सुधारणा दिसून येत आहे.
 
 आराेग्य : या आठवड्यात तुमची तब्बेत उत्तम राहील. तुम्हाला तब्बेतीबाबत काेणत्याही प्रकारची माेठी समस्या असणार नाही, पण सर्दीखाेकल्याचा त्रास सतावू शकताे. या आठवड्यात तुमची मानसिक तणावातून मुक्तता हाेईल. ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. पण तुम्ही खाण्या-पिण्याबाबत दक्षता बाळगायला हवी.
 
 शुभदिनांक : 26, 27, 1
 
 शुभरंग : निळा, पिवळा, हिरवा
 
 शुभवार : मंगळवार, गुरुवार, शनिवार
 
 दक्षता : या आठवड्यात नवे काम करण्यापूर्वी बारकावे समजून घ्यावेत.
 
 उपाय : या आठवड्यात कुमारिकांना मिठाई खाण्यास द्यावी. ‘ॐ वक्रतुंडाय नम:’ मंत्राचा जप करावा.