सुख, शांती जे आपल्याकडे पूर्वीपासूनच आहे ते का शाेधायचे?

08 Dec 2024 23:17:01
 
 

Health 
 
सुखाची खाेल पातळी शांती आहे. तर उथळ पातळी मस्ती आहे. सांगायचे तात्पर्य आपले सुख आपल्यातच आहे.आपले सुख स्वत: शाेधावे असे सांगितले जाते. सांगायला हे जरी साेपे असले तरी थाेडा खाेल विचार कराल तर शाेधले तेच जाते जे हरवलेले असते. कशाचा शाेध घ्यावयाचा आहे. सुख, शांती हा आपला मूळ स्वभाव आहे. समजा आपण हा काेठे तरी ठेवून विसरलाे असू तर आपण ताे शाेधायला हवा.जे आपल्याकडे पूर्वीपासूनच आहे ते का शाेधायचे? जसा चष्मा आपल्या डाेळ्यांवर असेल व आपण ताे इतरत्र शाेधत राहताे. माेबाइल कुठे विसरला तर रिंग देताे. टाेन ऐकू येताे व ताे काेठे ठेवला आहे ते आठवते. असेच सुखाबाबत काही नवे शाेधावे लागत नाही. इतरत्र शाेध घ्यावा लागत नसताे.
 
आपण जन्मापासूनच जी गाेष्ट साेबत आणली आहे ती कुठे ना कुठे जीवनाच्या काेपऱ्यात विसरलेली असेल. एखादा अत्यंत श्रीमंत माणूस स्वप्नात पाहताे की ताे गरीब झाला आहे. तेव्हा गरीबीचा अस्वस्थपणाही त्याच्यामध्ये असेल. ताे खूप त्रासलेला आणिगांजलेलाही असेल.पण स्वप्न तुटताच ताे पुन्हा श्रीमंत हाेईल. याप्रमाणेच आपण जीवनात एका स्वप्नात जाताे. ते स्वप्न असते अशांतीचे, अस्वस्थपणाचे. त्यातून जरा जाग येताच पुन्हा आपण आपल्या मूळ रूपात स्वत:ला शांत पाहाल. आपलेच हरवलेले सुख आणि शांती शाेधण्यास मदत हाेते याेग केल्याने. याेग यासाठी करावा की काही असे आहे जे आपण कुठेतरी ठेवून विसरून गेलाे आहे आणि ते सहजतेने शाेधू शकू
Powered By Sangraha 9.0