भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखाे अनुयायी चैत्यभूमीवर येतात. त्यांची गैरसाेय हाेणार नाही याची दक्षता घेऊन संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने नियाेजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिले. 6 डिसेंबरला मुंबईत स्थानिक सुटी जाहीर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठीच्या साेयीसुविधांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतला. या बैठकीस माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित हाेते.
मुख्य सचिव सुजाता साैनिक, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, पाेलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई महापालिकेचे आयु्नत तथा प्रशासक भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डाॅ. के. गाेविंदराज, गृह विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार सिंग, सामाजिक न्याय विभागाचे सचिव विजय वाघमारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, काेकण विभागीय आयु्नत डाॅ. राजेश देशमुख, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांच्यासह संबंधित विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित हाेते.सुविधांमध्ये काेणतीही कमतरता राहणार नाही यासाठी समन्वयाने प्रयत्न करावेत, अशा सूचना देऊन फडणवीस यांनी विविध सुविधांबाबतची माहिती घेतली.