कन्या

    30-Dec-2024
Total Views |
 
 

Horoscope 
 
या आठवड्यात तुम्ही एखाद्या सुंदर स्थळी फिरायला जाऊ शकता, साेबतच एखाद्या सामाजिक कार्यक्रमाचा भाग बनू शकता वा ताे आयाेजित करू शकता.कार्यक्षेत्रातील वातावरण तुमच्या मनासारखे असल्यामुळे तुम्ही कामात रमाल.सध्या काेणत्याही नव्या याेजनेचा विचार करू नये.
 
 नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात प्रमाेशन वा नव्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. बिझनेसमध्ये नव्या याेजनांवर काम करण्यासाठी ही याेग्य वेळ आहे. तुम्ही घेतलेल्या परिश्रमाचे तुम्हाला उत्तम फळ मिळेल तसेच माेठ्या प्रमाणात आर्थिक लाभही हाेईल.
 
 नातीगाेती : या आठवड्यात तुम्ही कुटुंबीयांसाेबत एखाद्या पर्यटन स्थळी फिरायला जाण्याचा आनंद लुटाल. त्याचप्रमाणे मित्रमंडळींसाेबत पार्टीचा आस्वाद घ्याल. जाेडीदारासाेबत राेमँटिक क्षणांचा आनंद घ्याल. तुमच्या प्रेमसंबंधात विश्वासार्हता वाढल्यामुळे तुम्ही जास्त आनंदी राहाल.
 
 आराेग्य : आराेग्याच्या दृष्टीने हा आठवडा सामान्य असणार आहे. तुम्ही सध्या नियमित व्यायामावर व सकस खाण्या-पिण्यावर भर द्यायला हवा. नवे वर्ष साजरे करण्याच्या भरात मद्यपान वा खाण्या-पिण्याचा अतिरेक हाेणार नाही याबाबत तुम्ही स्वत:ला जपायला हवे.
 
 शुभदिनांक : 29, 30, 03
 
 शुभरंग : हिरवा, निळा, क्रीम
 
 शुभवार : बुधवार, शुक्रवार, शनिवार
 
 दक्षता : कार्यस्थळात घाईगडबड करू नये, परिस्थितीचे आकलन करा.
 
 उपाय : बुध ग्रहासाठी हिरवी वस्त्रे दान करावीत.