सिंह

    30-Dec-2024
Total Views |
 

Horoscope 
 
या आठवड्यात तुम्हाला तुमच्या वरिष्ठांचे व सहकर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभणार आहे. पैशांशी संबंधित व्यवहारात तुम्ही सावधगिरी बाळगायला हवी.वायफळ खर्च करण्याचे या आठवड्यात टाळायला हवे. भावनेच्या भरात काेणत्याही प्रकारचा माेठा निर्णय घेऊ नये.
 
 नाेकरी-व्यवसाय : हा आठवडा करिअरच्या दृष्टीने तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक राहील. एखादी महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते. जी तुम्ही कुशलतेने पार पाडाल. बिझनेसमध्ये नवे डील फायनल हाेण्याची श्नयता आहे जे भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरणारे असेल.
 
 नातीगाेती : तुमच्या काैटुंबिक जीवनात शांततेचे वातावरण असेल.तुम्हाला तुमच्या जाेडीदाराची पूर्ण साथ लाभेल. तुम्ही जर प्रेमसंबंधात असाल तर या आठवड्यात त्यात प्रगती दिसून येईल. तुम्ही जर विवाहाचा विचार करीत असाल तर त्यासाठी हा उत्तम काळ आहे.
 
 आराेग्य : तुम्ही तुमच्या तब्बेतीबाबत जास्त सावध राहायला हवे.कारण कामाच्या व्यापामुळे तुम्हाला थकवा जाणवेल तसेच काहीसा मानसिक ताणही राहील. तुम्ही तुमची ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी पुरेशी विश्रांती घ्यायला हवी व संतुलित आहार घ्यायला हवा.
 
 शुभदिनांक : 28, 31, 04
 
 शुभरंग : गुलाबी, पिवळा, लाल
 
 शुभवार : साेमवार, मंगळवार, गुरुवार
 
 दक्षता : कामाचे ओझे वाढू शकते यामुळे वेळेचे याेग्य नियाेजन करा.
 
 उपाय : सूर्यदेवाला अर्घ्य द्यावा आणि रविवारी गूळ दान करावा.