अटळ मृत्यूबाबत जाणून घेण्याची प्रवृत्ती वाढते

    30-Dec-2024
Total Views |
 
 



Death
 
 
अटळ मृत्यूबाबत जाणून घेण्याची प्रवृत्ती वाढत आहसजीवासाेबत मृत्यूचाही जन्म हाेताे. त्याची एक अनामिक भीती प्रत्येकाच्या मनात असल्याने या विषयावर बाेलणे टाळले जाते. पण, सध्याच्या काळात मृत्यूबाबत जाणून घेण्याची प्रवृत्ती वाढत असून, मृत्यू कॅफे (डेथ कॅफे) अथवा मृत्यू ध्यानासारखे (डेथ मेडिटेशन) उपक्रम त्यात केले जातात. बहुसंख्य भारतीय कुटुंबांत मृत्यूची चर्चा मृत्युपत्र, मालमत्ता, त्या व्यक्तीचे आजारपण आदींभाेवतीच फिरते. मृत्यूबाबतच्या भावनेवर काेणी बाेलत नाहीत. पुण्यातील मनीषा सेठ या पर्यावरणवादी असून, त्या eCoexist ही सामाजिक संस्था चालवितात.त्यांची आई डाॅ. माधुरी सेठ यांना मनीषा यांनी लहानपणापासून कायम घरातील आजारी लाेकांची काळजी घेताना पाहिले. या नातलगांची निधनेही मनीषा यांनी पाहिले. ‘मृत्यूबाबत सहजपणे बाेलल्या जाणाऱ्या घरात मी वाढले. मृत्यू ही फार माेठी घटना नसल्याचे माझी आई सांगत असे आणि बाेलण्याचा विषय तसाच असे,’ असे मनीषा या सांगतात.
 
डाॅ. माधुरी यांना वयाच्या 86व्या वर्षी ट्यूमरचे निदान झाले आणि त्यांनी त्यावर काेणतेही उपचार न घेण्याचा निर्णय केल्यावर त्यांची काळजी घेताना मनीषा यांची कसाेटी लागली. मुलीच्या हातांत हात असताना आईचे निधन झाले. मनीषा म्हणतात, ‘अखेरच्या दिवशीसुद्धा आईने डाॅ्नटरांना बाेलावू दिले नाही. तिला एक-दाेनदा पॅनिक अटॅक आले हाेते. मी तिचे शेवटचे क्षण बघत हाेते.मला त्यांची भीती वाटली नाही. आई शांतपणाने मरण पावली. आम्ही मृत्यूबाबत माहीतगार झाल्याने हा प्रसंग निभावता आला. मात्र, आईचा मृत्यू हा माझ्यासाठी खूप वेगळा अनुभव हाेता.’ मनीषा सेठ या केअरगिव्हिंगच्या क्षेत्रात काम करतात. मृत्यूबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी त्यांनी पन्नास सदस्य असलेला Dying To Learnहा ऑनलाइन अभ्यास गट स्थापन केला आहे. मनीषा सेठ यांच्यासारखे अनुभव आलेले काही लाेक असू शकत असले, तरी बहुसंख्य भारतीय मृत्यूबाबत बाेलणे अशुभ मानत असल्याने या विषयावर बाेलणे टाळणारा समाज अशी भारतीयांची ओळख झाली आहे.
 
मात्र, त्यामुळे जीवनाच्या शेवटच्या काळात काय नियाेजन करावे, अवयवदान आणि काेणत्या पद्धतीने अंत्यसंस्कार करावेत यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष केले जाते.मृत्यूच्या अटळत्वाची जाणीव आपल्याला काेराेना महामारीमुळे सर्वांत जास्त झाली. अनेकांना प्रियजन गमवावे लागल्याने जीवन किती क्षणभंगुर आहे हे समजले. पण, त्यातून आपण किती मृत्युसाक्षर(death literate) झालाे, या प्रश्नाचे उत्तर ‘विशेष नाही’ असे येते.जगाचा निराेप घेण्यापूर्वी आपल्या मालमत्तेची व्यवस्था करण्याची जाणीव अनेकांना झाली असली, तरी खूप काही करावे लागेल. त्यासाठी मृत्युसाक्षरता वाढविण्याचे प्रयत्न उपयुक्त ठरतील. स्मृतीचा साधन म्हणून उपयाेग मृत्युसाक्षरतेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या Maajhi या प्लॅटफाॅर्ममध्ये बिहेवियरल डिझाइनचे काम कृतिका शर्मा या करतात.त्या म्हणाल्या, ‘मृत्युसाक्षरता म्हणजे आपल्या जीवनाच्या अखेरच्या क्षणांचे नियाेजन करणे.आपल्या मृत्यूनंतर मागे असलेल्यांसाठी याेग्य व्यवस्था करणेही यात येते. माझी म्हणजे हिंदीमध्ये नावाडी. माणसाच्या मृत्यूनंतर एक नावाडी आत्म्याला पैलतीरावर नेत असल्याचा अनेक संस्कृतींचा विश्वास आहे.
 
(death meditation सेशन्सही घेतली जातात. Last Dialogue या नावाचे एक टूलकिटही आहे. मरणाची भीती वाटणे आणि गमावलेल्या प्रियजनांच्या आठवणी येत राहणे नैसर्गिक असते. या स्मृती आपल्या दु:खाची तीव्रता कमी करण्यासही मदत करतात. गमावलेल्या प्रियजनांच्या आठवणी आणि त्यांच्याबाबत बाेलण्यामुळे आपल्यालाही याच वाटेने जावयाचे असल्याची जाणीव हाेऊन मृत्यूबाबतची भीती काहीशी कमी हाेते. याच हेतूने काेझिकाेडेमधील institute of Palliative Medecine (IPM)या संस्थेने ऑस्ट्रेलियातील ‘डेथ लिटरसी इन्स्टिट्यूट’च्या मदतीने 2021पासून या संदर्भातील दाेन दिवसांची कार्यशाळा आयाेजित करणे सुरू केले आहे. हा कार्यक्रम दरमहा हाेताे आणि ऑनलाइन तसेच प्रत्यक्ष उपस्थिती अशा पद्धतीने ताे करता येताे. प्रियजनांच्या मृत्यूनंतर हाेणाऱ्या दु:खाच्या विविध टप्प्यांना कसे सामाेरे जावे याबाबत त्यात मार्गदर्शन केले जाते. विंग कमांडर (निवृत्त) आणि भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा हे कृतिका यांचे वडील असून, त्यांनीच ‘माझी’ हे नाव सुचविले. या प्लॅटफाॅर्मवरून लाेकांना मृत्युपत्र लिहिण्यास उद्युक्त केले जाते आणि मृत्यू ध्यानाची