‘मित्रा’ने विविध क्षेत्रांत दिशादर्शक काम करावे

    30-Dec-2024
Total Views |
 
 


CM 
 
देशातील अग्रेसर राज्य म्हणून महाराष्ट्राचा लाैकिक कायम ठेवण्यासाठी वित्तीय सुधारणा, खनिकर्म, गटशेती, साैरऊर्जा प्रकल्प, जैवइंधन, आंतरराष्ट्रीय स्तरावरील राेजगाराच्या संधी यासारख्या प्राधान्य क्षेत्रांच्या विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फाॅर ट्रान्सफाॅर्मेशन (मित्रा) या संस्थेने दिशादर्शक काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फाॅर ट्रान्सफाॅर्मे शनची (मित्रा) बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृहात झाली. मुख्य सचिव सुजाता साैनिक, वित्त विभागाचे अतिर्नित मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, ‘मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगाेपाल रेड्डी, मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, वित्त विभागाच्या सचिव शैला ए., कृषी व पर्यटन सचिव जयश्री भाेज यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, ‘मित्रा’चे पदाधिकारी उपस्थित हाेते. मुख्यमंत्र्यांनी जायकवाडी प्रकल्पातील साैरऊर्जा प्रकल्प, शेतीतील टाकाऊ बाबींपासून बायाेगॅसनिर्मिती, गाेरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय आदी विषयांचाही सविस्तर आढावा घेतला.राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी राजकाेषीय तूट कमी करणे, भांडवली गुंतवणुकीवर भर देणे, मालमत्तांचे सनियंत्रण, याेजनांचे अभिसरण, जलसंधारणाचे अपूर्ण प्रकल्प गतीने पूर्ण करणे, राज्याची डेटा पाॅलिसी, खनिकर्म पाॅलिसी यासारख्या बाबींना प्राधान्य द्यावे, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.