पुणे, 22 डिसेंबर (आ.प्र.) :
राज्य प्रशासकीय सेवेतून केंद्रीय प्रशासकीय सेवेत पदोन्नतीने गेलेल्या राज्यातील 23 अधिकाशांची नियुक्ती शनिवारी करण्यात आली. त्यांची बदली करून त्यांना नवीन पदे देण्यात आली आहेत. त्यामध्ये पुण्यातील पाच अधिकाशयांचा समावेश आहे. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त (महसूल) अण्णासाहेब चव्हाण यांची रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तर उपायुक्त (सामान्य विभाग) वर्षा मुकुंद-लड्डा यांची मुंबईत माविमच्या व्यवस्थापकीय संचालकपदी पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे.
पुण्यातील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे संचालक नंदू बेडसे यांची छत्रपती संभाजीनगर येथे अल्पसंख्याक विकास विभागाचे आयुक्तपदी, पुण्यातील शिक्षण सहसंचालक दिलीप जगदाळे यांची कल्याण येथे महाडिस्कॉमचे सह-व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. यशदाचे सहयोगी प्राध्यापक मंगेश जोशी यांना यशदाचे उपमहासंचालक म्हणून बढती देण्यात आली. पदोन्नतीने अन्य झालेल्या बदल्यांमध्ये अमरावतीचे विभागाचे उपायुक्त (सामान्य) संजय पवार यांची चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, लातूर जिल्हा जातवैधता समितीचे अध्यक्ष सुनील महिंद्राकर यांची व्यवस्थापकीय संचालक, एमएसपदी विधान परिषदेच्या उपसभापतींचे खाजगी सचिव रवींद्र जिवाजी खेबुडकर यांची, अल्पसंख्याक विकास विभागाचे सहसचिव म्हणून वाशिम जिल्हा जातवैधता समितीचे अध्यक्ष, लक्ष्मण राऊत यांची बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागाचे अतिरिक्त आयुक्तांची बाबासाहेब जालिंदर बेलदार यांची तेथेच अतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून, तेथील विभागीय उपायुक्त (सामान्य) जगदीश मिनियार यांची छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी, मुंबई मेट्रो कॉर्पोरेशनच्या महाव्यवस्थापक (जमीन) माधवी समीर सरदेशमुख यांची कल्याण-डोंबिवलीच्या स्मार्टसिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.