सात गाेष्टींद्वारे कायम सुदृढ निराेगी राहा

    17-Dec-2024
Total Views |
 
 
 

Health 
नेहमी सक्रिय राहा : यासाठी आठवड्यात 150 मिनिटे एराेबिक व्यायाम करा वा 75 मिनिटे वर्कआउट, जाॅगिंग, जिम इ. व्यायामाचा हा काळ एक आठवड्यात समान विभाजित करून व्यायाम करा.जेणेकरून शरीराच्या प्रत्येक भागाला याचा भरपूर फायदा मिळू शकेल.
 
पाैष्टिक पदार्थ खा : वेगवेगळ्या रंगांची फळे व भाज्यांनी भरपूर जेवण करा. आपल्या जेवणात धान्य, कमी फॅटची दूधउत्पादने, पाेल्ट्री उत्पादने, मासे, सुकामेवाही सामील करा. साखर, मीठ व काेल्ड ड्र्निंस टाळा.
 
वजन कमी करा : उत्तम आराेग्यासाठी आपले वजन याेग्य ठेवणेही आवश्यक आहे.यासाठी आपण जेवढी कॅलरी खाल त्यापक्षा जास्त खर्च करा. यामध्ये पाैष्टिक जेवण करणे व सक्रिय राहणे यामुळे मदत मिळेल.
 
काेलेस्ट्राॅल नियंत्रित ठेवा : आपल्या शरीरात काेलेस्ट्राॅल दाेन स्राेतांमधून येतात.एक आपले शरीर आवश्यक काेलेस्ट्राॅल बनवते तर दुसरे जे जेवण आपण करताे.यासाठी खाण्या-पिण्यात दक्षता बाळगा.वेगवेगळ्या रंगांनी भरपूर जेवण करा व शारीरिक क्रियांकडे लक्ष द्या.बीपीचे व्यवस्थापन करा : कित्येकदा आर्टरीत रक्तदाब जेवढा असायला हवा त्यापेक्षा जास्त असताे. यालाच हायबीपी म्हणतात. खाण्या-पिण्यात बेपर्वाई आणि तणावग्रस्त राहिल्यामुळे ब्लडप्रेशर वाढू शकते. यासाठी या दाेन्ही गाेष्टी सांभाळा.
 
रक्तात शुगरपातळी कमी ठेवा : आपल्या शरीराला ऊर्जा मिळावी यासाठी ब्लडग्लूकाेजची गरज असते. जी आपल्या शरीराला जेवणातून मिळते. पण जेवणात जादा शुगर सामील करणे आराेग्यासाठी हानिकारकच ठरू शकते.
 
धूम्रपानापासून दूर राहा : उत्तम आराेग्यासाठी सर्वांत चांगले असते स्वत: धूम्रपान न करणे. कारण धूम्रपानाने रक्ताभिसरण तंत्राचे नुकसान हाेत असते आणि अनेक गंभीर आजारांची श्नयता वाढत जाते.धूम्रपान करीत साल तर ते त्वरित बंद करा.खाणेपिणे व व्यायामावर लक्ष द्या.